Leopard attack

Leopard attack । आईवडील ऊस तोडण्यात रमले, बिबट्याने चिमुरडीवर केला हल्ला; पोटचा गोळा डोळ्यादेखत गेला

बातम्या

Leopard attack । सध्या राज्यात उसाची तोडणी (Cutting sugarcane) सुरु आहे. ऊसतोड कामगार (Sugarcane worker) दूरदूरवरून दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आज या ठिकाणी तर उद्या या ठिकाणी ऊसतोड कामगारांना जावे लागते. भल्या पहाटे ते आपल्या मुलाबाळांसह तोडणीला येतात. अशावेळी अनेकदा बिबट्या (Leopard) हल्ला करत असतात. अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

Poultry Business । कमी जागा आणि कमी पैशात सुरु करा लाखो रुपये मिळवून देणारा कुक्कुटपालन व्यवसाय, अशी करा सुरुवात

ऊसतोडणी सुरु असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज गावात ऊसतोड मजुरांना बिबट्याची (Leopard Attack in Srigonde) दहशत पाहायला मिळाली. एका क्षणात शुक्रवारी सायंकाळी बिबट्याने या चिमुकलीचा जीव घेतला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच गावात भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.

Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी अजनुज येथे एका हॉटेल मागे असणाऱ्या मजुरांच्या राहोटी बाहेर खेळत असणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिच्या डोक्याला, मानेला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. जखमा खोलवर झाल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव येथून मजुरीसाठी हे कुटुंब आले होते.

Success Story । कांद्याच्या पट्ट्यात फुलवली केळीची बाग, कमी खर्चात मिळवलं लाखोंचं उत्पादन; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

मिळणार २५ लाख रूपयांची मदत

दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा आणि कर्जत यांच्या संयुक्त अजनुज गावात घेतलेल्या ग्रामसभेत नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती देत सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. या पिडित कुटुंबाला २५ लाख रूपयांची शासनाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *