Onion Storage । दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड (Onion cultivation) केली आहे. पण कांदा उत्पादक शेतकरी यंदा चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण कांद्याचे दर (Onion rate) कमालीचे पडले आहेत. कांद्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. अनेकजण कांदा साठवून ठेवतात. पण अनेकदा साठवून ठेवलेला कांदा खराब होतो. त्यासाठी त्याची साठवणूक योग्य प्रकारे करावी लागते.
Onion Market । मोठी बातमी! बाजार समित्या नाही तर शेतकरी संघटना सुरू करणार कांद्याचे लिलाव
अनेक कांदा उत्पादक शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या चाळीमध्ये साठवून ठेवतात. पण शेतकऱ्यांच्या या पद्धतीमुळे कांदा लवकर सडतो. कांदा सडल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो. अयोग्य पद्धतीने कांदा साठवून न ठेवल्याने कांद्याची प्रत आणि टिकाऊपणावर याचा मोठा परिणाम होतो. (Onion chaal funding scheme)
Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज
पण तुम्ही शास्त्रीयदृष्ट्या कांदाचाळ उभारली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुमच्याकडे कांदाचाळ उभारण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता सरकार तुम्हाला मदत करेल. हे लक्षात घ्या की ५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३,५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाते.
Sorghum Market । शेतकऱ्यांना अच्छे दिन! पांढऱ्या ज्वारीला मिळतोय हंगामातील सर्वात जास्त भाव
जाणून घ्या अटी
- शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन असावी.
- ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असावी.
- शेतकऱ्याकडे कांद्याचे पिक असावे.
- योजनेचा लाभ हा वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघांना घेता येईल.
LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी
आवश्यक कागदपत्रे
- सातबारा
- ८ अ
- आधार कार्डाची छायांकित प्रत
- जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
- आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
Drought In Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला
असा करा अर्ज
- योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉर्टनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
- तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करा.
- पूर्वसंमतीनंतर दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे गरजेचे असते.
- तुम्ही अधिक माहितीसाठी कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.