Sorghum Market । कमी पाण्यात येणार पीक म्हणून ज्वारीची (Sorghum) ओळख आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ज्वारीची लागवड करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्वारीला प्रत्येक वेळी चांगला भाव (Sorghum rate) मिळतोच असे नाही. अनेकदा ज्वारीचे दर खूप पडलेले असतात. यंदा मात्र ज्वारीमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. ज्वारीला सध्या हंगामातील सर्वात जास्त दर मिळत आहे. (Sorghum rate today)
LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी
ज्वारीचे वाढले दर
ज्वारीची आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 10 हजार 537 क्विंटल आवक झाली. यात आज सर्वात जास्त म्हणजे 3309 क्विंटलची शाळू ज्वारीची आवक झाल्याचे पाहायला मिळाले. (Sorghum rate hike) लातूर जिल्ह्यात आज पांढऱ्या ज्वारीला हंगामातील सर्वात जास्त 10 हजार 325 रुपये दर मिळाला. तसेच आज ज्वारीला सरासरी 2100 रुपयापासून ते 4000 रुपये दर मिळाला आहे.
Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये
दर वाढल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्वारीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत कमालीची वाढ झाली आहे. इतकेच नाही तर आज वसंत ज्वारीची सुद्धा आवक झाली. पुणे बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3400 रुपये तर मालदांडी ज्वारीला सरासरी 2786 रुपये ते 4150 रुपयांचा दर मिळाला आहे.
Drought In Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांच्या मालदांडी ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3600 रुपये दर मिळाला असून लातुर जिल्ह्यातील औराद शहाजानी या बाजार समितीत ज्वारीला सरासरी 10 हजार 325 रुपये उच्चांकी दर मिळाला आहे.