Land Rule । सतत जमिनीशी निगडित वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. अशातच आता तुकडेबंदी कायद्यात (Fragmentation Act) मोठा बदल करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत.
Success Story । पाटलांचा नादच खुळा! खडकाळ जमिनीत काढले तब्बल १२० टन उसाचे उत्पादन
तुकडेबंदी कायद्यात बदल
राज्य सरकारने केलेल्या तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे आता शेतकऱ्यांना १ ते पाच गुंठ्यापर्यंत जमीन खरेदी करता येणार आहे. कायद्यानुसार बागायती क्षेत्र किमान १० गुंठे तर जिरायती क्षेत्र किमान २० गुंठ्याची खरेदी करता येत होती. तसेच या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी करायची असल्यास त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी लागत होती.
पण आता नवीन कायद्यानुसार, ज्या शेतकऱ्यांना शेतरस्ता, घरकूल किंवा विहिरीसाठी जागा पाहिजे असेल अशा शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने १ ते ५ गुंठे क्षेत्राची खरेदी करता येईल. त्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुनासुद्धा महसूल व वनविभागाने दिला आहेत. यात खरेदीदाराचे आणि विक्री करणाऱ्याचे नाव, पत्ता, विहिरीचा आकार,गट नंबर, भूजल सर्वेक्षण यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, सहधारकांचे संमतीपत्र या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
हे लक्षात घ्या की वरील कारणांसाठी जमीन खरेदीची परवानगी जिल्हाधिकाऱ्याने दिली तर ही मंजुरी फक्त एका वर्षासाठीच असणार आहे. मुदत संपल्यानंतर विनंतीवरून दोन वर्ष या परवानगीमध्ये वाढ केली जाईल. पण त्या काळात जमिनीचा वापर झाला नाही तर परवानगी रद्द होऊ शकते असे या आदेशात म्हटलं आहे.
Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”