Baramti News । दि. 23/03/2024 सावंतवाडी (गोजूबावी) ता. बारामती येथे सामिंद्राताई सावंत यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाने SPK नैसर्गीक शेती तंत्राच्या माध्यमातून साकारलेल्या देशी / गावरानी बियाणे बीज बँकेमध्ये 150 पेक्षा जास्त गावरानी भाजीपाला बियांचे जतन/ संगोपन केलेले आहे. व देशी बियांच्या वाढीसाठी महीला बचत गट, शेतकरी बचत गट व कृषी प्रदर्शनाच्या माध्यमात्तून प्रचार प्रसाराचे ही काम करत आसतात.
या त्यांच्या नावीन्य पूर्ण उपक्रमाची दखल घेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून मॉडेल जिनोम क्लब या योजनेच्या माध्यमातून कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ विजू अमोलिक व अमोल संसारे प्रकल्प सहयोगी मॉडेल जिनोम क्लब MPKV राहुरी. त्यांनी या देशी/ गावरानी बीज बँकेच्या उपक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला व संपुर्ण कुटुंबाचा सत्कार केला.