Farmer loan । शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. अशावेळी शेतकरी बँकेकडून कर्ज (Bank loan) घेतात. काही शेतकरी कर्जाची वेळेत परतफेड करतात. तर काही शेतकऱ्यांना कर्जाची वेळेत परतफेड करता येत नाही. कर्जाची (Loan) वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून (Cooperative Division) सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सहकारी विभागाचा शेतकऱ्यांना दिलासा
मार्च अखेर असल्यानं आता बँक शेतकऱ्यांकडे पीककर्ज (Pik loan) वसूलीसाठी तगादा लावत आहे. पण नियमित आणि दिलेल्या वेळेत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीककर्जातील फक्त मुद्दल वसुल करावी. या शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करू नये, अशा महत्त्वाच्या सूचना राज्य सहकारी विभागानं जिल्हा मध्यवर्ती बँकांना (District Central Banks) दिल्या आहे.
Garlic Price । लसणाचा भाव का आहे चर्चेत? जाणून घ्या सध्या बाजारात किती भाव मिळतोय
राज्य सहकारी विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यावर्षी राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पन्न कमी असल्याने शेतकऱ्यांना यंदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या मार्च महिना संपत आला आहे. अशावेळी बँका शेतकऱ्यांकडे कर्जफेडीचा तगादा लावत आहेत.
Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७९ ‘अ’ मधील अधिकारांतर्गत त्रिस्तरीय पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती आणि प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्थांना निर्देश दिले आहे. निर्देशानुसार, पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असल्यास त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
Tamarind Rate । आंबट गोड चिंच खातेय भाव! प्रति क्विंटन मिळत आहे ‘इतका’ दर
मिळणार प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ
इतकेच नाही तर मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ द्यावा. शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरवावं, अशी सूचना केली आहे. पण अजूनही या योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नाही, असे शेतकरी सांगत आहेत. यंदा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनं निर्णयांचा सपाटा लावला आहे.
Soyabeen Rate । सोयाबीन उत्पादकांवर आर्थिक संकट! भाव नसल्याने पीक घरातच पडून