Tamarind Rate । मागील काही वर्षांपासून देशातील काही भागात पावसाने पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे पिक घेऊ लागले आहेत. या पिकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होऊ लागली आहे. अनेक शेतकरी चिंचेचे उत्पादन घेत आहेत. चिंचेचे एक झाड हजारो रुपयांची कमाई करून देत असल्याने शेतकऱ्यांचा चिंचेची लागवड करण्याचा कल वाढला आहे. इतकेच नाही तर काही शेतकऱ्यांकडे पिढ्यान् पिढ्या चिंचेची झाडे आहेत.
चिंचेला बाजारात मिळतेय चांगली मागणी
शेतकरी आता पारंपरिक पद्धतीची शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यामध्ये चिंचेचा देखील समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरातील काही शेतकरी चिंचेचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या चिंचेला तेलंगणा, आंध्रप्रदेश मध्ये खूप मोठी मागणी आहे. चिंचेला सध्या प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये दर मिळत आहे. चिंचेला चांगला दर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे. दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समानधानाचे वातावरण आहे.
Qionoa Farming । शेतकरी मित्रांनो क्विनोआची लागवड करून व्हाल मालामाल, एक लाख क्विंटलपर्यंत मिळतो भाव
व्यापारी चिंचेची लहान मोठे झाडे खरेदी करतात. चिंच सोडून तिला दोन ते तीन रुपये दराने विकले जाते. चिंचेतील चिंचुके वेगळे करून चिंचा विक्रीसाठी नेतात. ग्रामीण भागातील चिंचेला तेलंगणा नांदेड आणि आंध्र प्रदेश मध्ये मोठी मागणी असून येथे चिंचेला नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या बाजारपेठांमध्ये तालुक्यातील विविध भागातून चिंचा गोळा करून विकल्या जात आहेत. चिंचेचे झाड शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळवून देत आहे.
Qionoa Farming । शेतकरी मित्रांनो क्विनोआची लागवड करून व्हाल मालामाल, एक लाख क्विंटलपर्यंत मिळतो भाव
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिंच चांगली फुटली असून अनेक व्यापारी माझ्याकडे चिंचेसाठी आले होते. सध्या माझ्याकडे चिंचेचे दोन मोठे झाडे आहेत या एका झाडाची चिंच तोडून केली तर त्यापासून मला दहा हजार रुपये मिळाले आहेत. व्यापारी झाडावरील चिंच तोडून नेत असल्याने मला चिंचेमुळे आर्थिक हातभार लागला, अशी प्रतिक्रिया हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरातील शेतकरी सय्यद समीर यांनी दिली आहे.
उत्पादनात वाढ
विशेष म्हणजे चिंचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसोबत चिंचेचे देखील उत्पादन घेत आहे, चिंच प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना नऊ ते दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकऱ्यांचा चिंचेकडे कल वाढू लागला आहे. जर तुम्हालाही शेतीसोबत दुसरे पीक घ्यायचे असेल तर तुम्ही चिंचेची लागवड करून उत्पादन मिळवू शकता.
Pune Crime । धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून