Soyabeen Rate । अनेक संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. त्यात शेतमालाला चांगला हमीभाव असतोच असे नाही. राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरआर्थिक संकट आले आहे. यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन खूप घटले. पण उत्पादन घटूनही शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. या उलट सोयाबीनचे दर आणखी घसरले.
आकडेवारीनुसार सांगायचे झाले तर मागील वर्षीपासून सोयाबीनचे दर 70 टक्क्यांनी घसरले आहे. घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. किमतीचा विचार केला तर सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी 4300 रुपयांचा दर मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षीपासून काही शेतकरी सोयाबीनचे भाव वाढतील याची अपेक्षा करत आहे. तर त्यामुळे त्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवला आहे.सोयाबीन हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील महत्त्वाचे पीक आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची गेल्या वर्षीपासून विक्रीच केली नाही.
Qionoa Farming । शेतकरी मित्रांनो क्विनोआची लागवड करून व्हाल मालामाल, एक लाख क्विंटलपर्यंत मिळतो भाव
त्यांच्याकडे पैसे नसल्याने शेतकरी आता पेरणी कशी करायची? जरी पेरणी करायची झाली तरी कर्ज कशाप्रकारे फेडायचे? घरात लागणारा खर्च, तसेच मुलांची लग्न , शिक्षण यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
Gas Cylinder | आनंदाची बातमी! पुढचे 10 दिवस गॅस सिलेंडर मिळणार मोफत
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे पण लग्नसरायचे दिवस असूनही बाजारात शुकशुकाट पसरल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते बाजारपेठेतही जात नाही. त्यामुळे आता का सोयाबीन उत्पादक शेतकरी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा अशी मागणी की करत आहेत. राज्यात कापसाची देखील हीच परिस्थिती आहे, कापूस विक्रीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे कापसाला देखील सरकारने 12000 रुपये क्विंटल भाव द्यावा अशी मागणी केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला 11000 रुपये पर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.