Gram prices

Gram prices । कसे असतील एप्रिलनंतर हरभऱ्याचे बाजारभाव? जाणून घ्या सविस्तर माहिती

बाजारभाव

Gram prices । भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची जवळपास 70% लोकसंख्या ही शेती आणि शेतीनिगडित व्यवसाय करते. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असून पिकांची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या हंगामात विभागली जातात. रब्बी हंगामात हरभरा (Gram) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतात.

Nutrient Deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या

दरम्यान, भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश (Gram producing countries) आहे. जगातील एकूण उत्पादनात भारताचा ७०- ७५ टक्क्यांचा वाटा आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा असून हरभऱ्याचा वापर डाळ आणि बेसन या दोन्ही स्वरूपात करतात. त्यामुळे हरभऱ्याला संपूर्ण वर्षभर मागणी (Demand of gram) असते. मागणी जास्त असल्याने याची किंमतही (Price of gram) जास्त असते. (Market price of gram)

Success Story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई

मार्च ते मे या कालावधीत हरभऱ्याची विक्री सुरु होते. चालू वर्ष जानेवारी २०२३-२४ मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत थोडी कमी झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये ती ०.५ लाख टन असून जी गेल्या वर्षी याच कालावधीत ०.८ लाख टन होती. सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन १३६.३ लाख टन होऊ शकते.

Bullock Cart Race । ऐकावं ते नवलच! ‘या’ ठिकाणी बैलगाडा शर्यत विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट

असे असतील दर

महाराष्ट्रातील २०२१-२२ मधील उत्पादन २७.२ लाख टनांवरून सन २०२२-२३ मध्ये ३६.३९ लाख टनांपर्यंत वाढू शकते. गेल्या वर्षीच्या २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये निर्यात वाढली आणि आयात कमी झाली आहे. लातूर बाजारातील संभाव्य किंमती एप्रिल ते जून २०२४ दरम्यान रु. ५,२०० ते ५,८०० रुपये प्रति क्विंटल राहू शकते. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या हरभऱ्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा.

PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मोफत मिळणार 300 युनिट वीज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *