Nutrient deficiency

Nutrient deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या

बातम्या

Nutrient deficiency । जर पिकात अन्नद्रव्यांची कमतरता (Deficiency of Nutrient) असेल तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. अन्नद्रव्यांची कमतरता असल्याने पिकांची व्यवस्थित वाढ होत नाही. पिकामध्ये जर फळ, पान, फुल यांचा रंग बदलणे किंवा फुल आणि फळांची गळ झाली तर पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही आता अन्नद्रव्याची कमतरता सोप्या पद्धतीने ओळखू शकता. (Nutritional symptoms)

Success Story । आर्थिक तंगीतूनही उभारलं गुऱ्हाळ, गुळविक्रीतून ‘हा’ शेतकरी करतोय लाखोंची कमाई

अन्नद्रव्याची लक्षणे

स्फुरदः झाड खुरटे बनून जुनी पाने गर्द हिरवे/जांभळट होतात. अति कमतरता असेल तर पाने तपकिरी किंवा काळी पडतात. पानाच्या खालच्या बाजूला तांबूस तपकिरी रंग दिसतो.
कॅल्शियमः झाडाचा गर्द हिरवा रंग. कोवळी पाने निस्तेज होऊन शेंड्याकडून वाळतात. शेवटी नवीन पाने मरून जातात.
लोहः पाने निस्तेज पिवळी आणि पानांवर ठिपके नसतात. पण मुख्य शिरा हिरव्या दिसतात.
जस्तः शेंड्याकडील पाने निस्तेज, अरुंद ,आखूड आणि शिरा गर्द हिरव्या. पानांच्या शिरांवर आणि कडांवर गर्द ठिपके दिसतात.
मॅग्नेशियमः पानांच्या कडा वरच्या दिशेने वाकून ठिपके नसतात. जुन्या पानांतील हिरवा रंग कडांकडून कमी होत जातो, देठ आणि पाने लालसर होऊन गळून पडतात.
बोरॉन: शेंड्याकडील पाने रंगहीन होऊन पानांवर सुरकुत्या आणि पिवळे पट्टे पडतात. तसेच नवीन फुटवे तुटून गळून पडतात.
गंधकः शेंड्याकडे असणारी पाने फिक्कट हिरवी, शिरा निस्तेज होतात. पानांवर ठिपके नसतात.
मोलाब्दः पाने फिक्कट हिरवी/पिवळसर/केशरी, शिरा वगळून पानांवर ठिपके, पानांच्या खालच्या बाजूला चिकट स्त्राव येतो.
पालाशः जुन्या पानांच्या शेंड्यांवर ठिपके तसेच कडा तपकिरी होतात. ठिपके करपून पानांचे शेंडे वाकतात.
नत्रः वाढ खुंटते. जुनी पाने जास्त निस्तेज व पिवळी होतात. संपूर्ण पान फिक्कट हिरवे/पिवळसर दिसते, जास्त कमतरता असेल तर पाने करपू लागतात.
मंगलः शेंड्याकडील पाने फिक्कट हिरवी, मोठ्या आणि बारीक शिरा गर्द हिरव्या आणि जाळीदार होतात.
तांबेः शिरांमध्ये फिक्कट गुलाबी रंग. फांदीच्या टोकाला पानांचे झुपके तयार होऊन पाने मुरगळतात आणि करपून गळतात.

Bullock Cart Race । ऐकावं ते नवलच! ‘या’ ठिकाणी बैलगाडा शर्यत विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *