Bullock cart race । आता प्रत्येक गावात, तालुक्यात आणि राज्यात बैलगाडा शर्यत भरत आहे. ठिकठिकाणाहून बैलगाडाप्रेमी (Bullock cart lover) शर्यतीत सहभागी होतात. शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी असते. विजेत्याला लाखो रुपयांचं बक्षीस दिलं जाते. बैलगाडा शर्यतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही दिवसांपासून बैलांच्या किमतीत (Price of bullocks) कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
PM Surya Ghar Yojana । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! प्रत्येक महिन्याला मोफत मिळणार 300 युनिट वीज
विजेत्याला मिळणार 1 BHK फ्लॅट
बैलगाडा शर्यतीची ग्रामीण भागात प्रचंड क्रेझ असून विजेत्याला मोठया रक्कमेची पारितोषिक (Bullock cart race winner prize) देण्यात येतात. सध्या एका बैलगाडा शर्यतीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. याला कारणही अगदी तसंच आहे. तुम्ही आतापर्यंत बैलगाडा शर्यत विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस दिल्याचं ऐकलं असेल पण कधी बैलगाडा शर्यत विजेत्याला चक्क 1 BHK फ्लॅट दिल्याचं ऐकलं आहे का?
Farmers Protest । दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला, पोलिसांनी सोडल्या ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या
या ठिकाणी आयोजित केली आहे स्पर्धा
होय, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन केले असून या शर्यतीचे नाव जयंत केसरी (Jayant Kesari) असं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे शरद लाहीगडे फाउंडेशनकडून 17 फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले आहे.
Crop Insurance Scheme । धनंजय मुंडे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 1 BHK फ्लॅट, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस मानलं जात आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हुन पेक्षा जास्त बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहेत. शर्यतीसाठी 10 एकरावर मैदान तयार केले आहे. 1 लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था केली आहे, अशी माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे.