Electricity

Electricity | सर्वात मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती

बातम्या

Electricity | राज्याला सतत वीज टंचाईचा (Power shortage) सामना करावा लागतो. अनेकदा तर विजेविना पिके जळू लागतात. राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. याचा फटका विजेवर (Electricity shortage) झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता दिलासादायक बातमी आहे. कारण राज्यात लवकरच 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती होईल, असा महावितरणाने दावा केला आहे.

Sugarcane Rate । ‘उसाला पाच हजारांचा दर मिळाला पाहिजे’; शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी

२४ एप्रिलला राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सुरू केली आहे. योजनेसाठी अल्पावधीत सार्वजनिक जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून ३५०० मेगावॅट वीजनिर्मिती होईल. नुकतीच कर्नाटकच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसोबत महावितरणकडून राबवण्यात आलेल्या एक लाख सौर कृषी पंप योजनेची माहिती घेतली.

Maize Procurement । बारामती बाजार समिती केंद्रावर मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात, अशी करा नोंदणी

यावेळी महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी शेतकऱ्यांना दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी मार्गदर्शन केले. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील कमीत कमी ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे लोकेश चंद्र यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Sugar Prices । सर्वसामान्यांना फटका! सणासुदीच्या काळात साखरेनं गाठला सर्वोच्च दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *