Sugarcane Rate । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे (Sugarcane) उत्पादन घेतले जाते. परंतु मागील अनेक दिवसांपासून उसाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने राज्याचे वातावरण तापले आहे. ऊस उत्पादकांमध्ये सरकारविरोधी नाराजी पसरली आहे. अशातच आता शेतकरी संघटना ऊस दरावरून आक्रमक झाली आहे. उसाला पाच हजारांचा दर (Sugarcane Season) मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटना करू लागल्या आहेत.
“मागील वर्षीच्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन एक हजार रुपये मिळावा. तसेच या वर्षी पुरवठा करणाऱ्या उसाला प्रतिटनास पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे; नाहीतर साखर, दूध आणि शेती मालही अडवू,” असा इशारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil) यांनी दिला आहे. शाहू स्मारक भवनात झालेल्या शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषदेमध्ये ते बोलत होते.
Sugar Prices । सर्वसामान्यांना फटका! सणासुदीच्या काळात साखरेनं गाठला सर्वोच्च दर
पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना दर द्या नाहीतर दोन कारखान्यांमध्ये असणारी अंतराची अट रद्द करा. काही संघटनांना हाताशी धरत साखर कारखानदारांनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या एफआरपी कायद्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत. या कायद्याला आम्ही विरोध केला. पण डिझेल, पेट्रोल दराने शंभरी पार केली. रासायनिक महागले, वाढत्या महागाईत ऊसउत्पादक भरडून निघाला आहे,’’ असे मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Kiwi Fruit । शेतकऱ्यांनो.. बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा किवी फळाची शेती, अशी करा लागवड