Kiwi Fruit । उच्च शिक्षण घेऊन अनेकांना नोकरी मिळत नाही. त्यात अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. लोकप्रिय कंपन्याही आपल्या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे अनेकजण शेतीकडे वळू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षित तरुण आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे.
तत्पूर्वी हे लक्षात घ्या की जर तुम्ही बाजारात जास्त मागणी असणाऱ्या पिकाची शेती केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर तुम्हाला प्रचंड मेहनत करून बाजारभावाविना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. त्यासाठी शेती करताना योग्य ते नियोजन गरजेचे आहे. बाजारात किवीच्या फळाला खूप मागणी आहे. जर तुम्ही किवीच्या फळाची शेती (Kiwi Fruit Farming) केली तर तुम्ही लखपती होऊ शकता.
अशी करा लागवड
किवीचे रोप 18 फूट असावे. लाईन ते लाईन अंतर बारा फूटच्या दरम्यान असावी. हे एक वेलवर्गीय झाड असूनया फळाचे नर आणि मादा असे दोन्ही प्रकारचे झाड लावावे लागते. (Kiwi Fruit Cultivation) नऊ मादा झाडांमागे एक नर किवी झाड लावा. जर तुम्ही एक हेक्टर क्षेत्रात किविफ्रूटची लागवड केली तर तुम्हाला सुमारे चारशे पंधरा झाडे लावावी लागतील. जर तुम्ही या फळाची लागवड जानेवारी महिन्यात केली तर त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळेल. (Kiwi Fruit Farming Information)
Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग
किवीची लागवड सुपीक, भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, वाळूमिश्रित चिकन माती असणाऱ्या जमिनीत करावी. जमिनीचा 7.3 पेक्षा कमी पीएच असावा. ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल तर किवीची लागवड करू नये. किवीला उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाणी लागते. या दिवसात दर १५ दिवसात पाणी द्यावे लागते.
Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे, IMDने जारी केला अलर्ट