Sugarcane workers

Sugarcane workers । गळीत हंगाम लांबणीवर पडणार? हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये देण्यासाठी ऊसतोड मजुरांचा संप

बातम्या

Sugarcane workers । पावसामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवर होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे, परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण वेगवेगळ्या मागण्यांच्या मुद्यावरुन ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनांनी संप पुकारला आहे. (Sugarcane workers strike)

Pesticide Ban । सर्वात मोठी बातमी! सरकारने घातली ‘या’ चार कीटकनाशकांवर बंदी; लगेचच पाहा कोणते ते कीटकनाशक?

या संपाला आता शेगाव-पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajle) यांनी दिला आहे. ऊसतोडणी मजुरांना सध्या 273 रुपये प्रति टन दर मिळत आहे आणि हार्वेस्टरला 400 प्रति टन दर दिला जात आहे. त्यामुळे आता ऊसतोडणी मजूरांनादेखील हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रति टन दर दिला जावा, अशी मागणी आता मजूरांकडून केली जात आहे.

Success story । शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! YouTube च्या मदतीने वाळवंटात केली गुलाबी पेरुची बाग

दरम्यान, पाथर्डी तालुक्यामध्ये ५० हजार ऊसतोड मजूर आहेत त्यांनीही या संपाला पाठिंबा द्यावा त्यामुळे राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ तसेच ऊसतोड मजूर संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार झाला होता. मजुरांना महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नाही त्यामुळे ऊसतोड मजूर आक्रमक झाले असून त्यांनी चालू हंगामात (Sugar Factory) संप करण्याचं निर्णय घेण्यात आला.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे, IMDने जारी केला अलर्ट

गळीत हंगाम कधी सुरु होणार?

येत्या १ नोव्हेंबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होईल, अशी चर्चा सुरु आहे. परंतु अजूनही गळीत हंगामाची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही. याच संदर्भात येत्या पाच सहा दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत यावर्षीच्या गळीत हंगामाची तारीख ठरवली जाईल, अशी माहिती साखर संकुलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *