Ethanol

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

बातम्या

Ethanol । यावर्षी देशात साखरेचे दर वाढले (Sugar price hike) आहे. ऊसाच्या उत्पादनात (Sugarcane products) घट झाल्याने दरांवर परिणाम झाला आहे. परंतु, केंद्र सरकारकडून (Central Govt) ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बी-हेवी मोलॅसेसपासून (B-heavy molasses) इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून (Oil Marketing Companies) प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे.

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

इथेनॉल निर्मितीवर बंदी (Ban on ethanol) घातल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कारखान्यांना मिळणारे उत्पन्न कमी होईल. शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) पेक्षा जास्ती पैसे मिळणार नाहीत.

Havaman Andaj । विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज….

या कारणामुळे घातली इथेनॉलवर बंदी

यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीचा शिल्लक ५७ लाख टनांचा साठा आणि यंदा उत्पादित होणारी २९० लाख टन साखरेचा हिशोब लावला तर देशात पुढील गाळप हंगाम सुरू होईपर्यंत ३४७ लाख टन साखर शिल्लक असणार आहे. पुढील वर्षीसाठी साखरेचा आगाऊ साठा वजा केल्यास देशाला जितकी गरज आहे तितकी २८५ लाख टनाच्या आसपास साखर उत्पादन होणार आहे. यंदा साखर कमी पडू शकते, असा अंदाज आहे. केंद्र सरकारकडून देशांतर्गत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी या पुरवठा वर्षासाठी साखरेपासून, उसाच्या रसापासून आणि सिरपपासून इथेनॉल उत्पादनावर बंदी (Ban on production of ethanol from syrup) घालण्यात आली आहे.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

केंद्राकडून बी-हेवी मळीपासून आणि सी-हेवी मळीपासून होणाऱ्या इथेनॉल उत्पादनावर बंदी घालण्यात आली नाही. ज्या कंपन्यांनी बी-हेवी आणि सी-हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनासाठी करार केले आहेत त्यांनी करार पूर्ण करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत पण हा करार संपल्यानंतर कंपन्यांना किंवा कारखान्यांना इथेनॉल उत्पादित करण्यास परवानगी असेल किंवा नसेल यावर अजून निर्णय झाला नाही.

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

कारखाने आणि शेतकऱ्यांना बसेल फटका

इथेनॉलवर बंदी घातल्याने कारखान्यांना होणारा जास्त फायदा होणार नाही. केंद्राने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा जास्त दर कारखान्यांना शेतकऱ्यांना देता येणार नाही. सरकारच्या या निर्णयाचा फटका कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना बसेल. मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने हमीभाव शेतकऱ्यांना देऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आहे. देशांतर्गत साखरेचे दर स्थिर राहतील. कामगारांच्या रोजगारावर परिणाम होईल.

Farmer suicide । धक्कादायक! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; केली आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *