Property Rights

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

बातम्या

Property Rights । काहीजण अनेक संपत्ती किंवा मालमत्ता (Property) कमावतात. त्यांच्या पश्चात त्या संपत्तीवर त्यांच्या मुलांचा हक्क असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपत्तीचे देखील प्रकार असतात. पूर्वीपासून ते आजपर्यंत संपत्तीवरून अनेक वाद होताना आपण पाहतो. काही वाद कोर्टापर्यंत (Court) जातात. या वादांमुळे अनेकदा जीवही जातात. दोन सख्खे भाऊ किंवा सख्ख्या भावा-बहिणींमध्ये संपत्तीवरून भांडणे (Fight over property) होतात.

Havaman Andaj । विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज….

न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

वडिलोपार्जित संपत्तीवर (Ancestral property) कुणाचा आणि किती हक्क आहे? (Ancestral property rights) या मुद्द्यावरुन सतत वाद होतात. काहीवेळा हे वाद खूप टोकाला जातात. न्यायालय यावर काय निर्णय देते यावर अनेक गोष्टी ठरत असतात. खास करून मुलींना संपत्तीत अधिकार मिळताना अडचणी येतात. मुलीचे एकदा लग्न झाले की तिचा संपत्तीतील अधिकार संपला, असे समजले जाते. याप्रकरणी न्यायालयाने आता महत्त्वाचा निर्णय दिला आहे. (Property rights of daughter in India)

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

मुलींबाबतीत मिळकतीच्या हक्कासंदर्भात आजपर्यंत अनेक भेदभाव केले गेले आहेत. हे चुकीचे आहे. मुलगा लग्न होईपर्यंतच आई-वडिलांचा मुलगा असतो परंतु मुलगी ही आयुष्यभर मुलगीच राहते. मागील कित्येक वर्षांपासून लग्न झालेल्या मुलीचा माहेरच्या संपत्तीतला हक्क कायमचा संपला अशी संकल्पना रूढ झाली आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

कायदा काय सांगतो?

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय कायदा हा प्रत्येकाला समान वागणूक देण्याच्या सिद्धांतावर काम करतो. कुठल्याही भेदभावाचा प्रसंग असल्यास सर्वात अगोदर कायदा हा त्या भेदभावाचे निर्मूलन करण्याचा आदेश देतो. भारतीय कायद्याच्या मूलभूत तत्वाला अनुसरून केंद्र सरकारने हिंदू वारसा कायदा 1956च्या अंतर्गत वर्ष 2005 मध्ये काही दुरुस्त्या केल्या असून त्यानुसार वडिलोपार्जित मिळकतीत मुलीला मुलाप्रमाणेच समान हक्क मिळण्यासाठी महत्त्वाचे फेरबदल केले होते.

Farmer suicide । धक्कादायक! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; केली आत्महत्या

9 सप्टेंबर 2005 पासून ही दुरुस्ती अमलात आणली जाणार होती. परंतु याबाबत खूप गोंधळ उडाला. अखेर सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाने एकमताने निकाल देऊन वडिलोपार्जित मिळकतीत मुलीचा समान हक्क आहे, यावर शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार आता वडिलोपार्जित मालमत्तेत किंवा संपत्तीत मुलींचा मुलांप्रमाणे समान अधिकार असणार आहे.

Success story । शहरात सुरु केला वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचा मॉल, लाखात होतेय कमाई, वाचा यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *