Success story । सध्या नोकरी करण्यापेक्षा अनेकजण स्वतःचा व्यवसाय (Business) करत आहेत. व्यवसायात नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येत आहे. काही तरुण नोकरी न करता व्यवसाय करत आहे, तर काही तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. परंतु, कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराची योग्य माहिती असायला हवी. नाहीतर तोटा सहन करावा लागतो.
सुरु केला कोंबड्यांचा मॉल
भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. काही जणांना शेतीतून फारसे उत्पादन कमावता न आल्याने ते शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry business) करतात. या व्यवसायाला जास्त जागेची गरज पडत नाही. कमी जागेत देखील हा व्यवसाय (Poultry farming) करता येतो. विशेष म्हणजे एका तरुणाने कोंबड्यांचा मॉल (Mall of chickens) सुरु केला आहे.
कमी खर्चात जास्त कमाई
खवले फॉर्म असे या कोंबड्यांच्या मॉलचे नाव आहे. संदीप खवले (Sandeep Khawle) असे या उद्योजक तरुणाचे नाव आहे. खवले हे या मॉलमध्ये एकूण वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचे संगोपन करतात. प्रत्येक पक्षाच्या जातीनुसार त्यांना वेगळे सेक्शन केले आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी जास्त पैसे खर्च केले नाहीत. कमी खर्चात खवले यांनी बांबूच्या झोपड्या बनवल्या आहेत.
कमी खर्चात बनवलेल्या बांबूच्या झोपड्यापासून फार्मला एक वेगळीच शोभा आली आहे. शेवग्याची झाडे आणि इतर फळझाडांपासून कोंबड्यांचे आरोग्य सुधरावे म्हणून त्यांनी चक्क ऑक्सिजन गार्डन केले आहे. झाडांचा पाला,मार्केटमधील वेस्ट भाजीपाला आणि फळे खायला देतात. यामुळे झाडांचा पाला आणि मार्केटमधील वेस्ट भाजीपाला तसेच फळे टाकून 50 ते 60 टक्के ते खाद्यावरचा खर्च वाचतो.
Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर
या फार्ममधील कोंबड्यांचे वजन दीड किलो पासून ते 5 किलो पर्यंत असते. शहर जवळ असल्याने अनेक ग्राहक हा मॉल फिरून त्यांना पाहिजे ती कोंबडी निवडतात. तसेच ग्राहक 150 ते 650 रुपये किलो प्रमाणे चिकन घेतात. फार्ममध्ये 50 पेक्षा जास्त कोंबड्यांची विक्री होते. खवले यांच्या या व्यवसायामुळे कित्येक जणांना रोजगार मिळाला आहे. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर लाखात पोहोचला आहे.
Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?