Success story

Success story । वडिलांसाठी तिनं सोडला आयटीचा 15 लाखांचा जॉब, आज शेतीतून करतेय कोट्यावधी रुपयांची उलाढाल

यशोगाथा

Success story । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. (Agriculture News)

Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय

अलीकडच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. छत्तीसगडमधील रायपूरमधील एका तरुणीने आपल्या वडिलांसाठी 15 लाखांची नोकरी सोडली आहे. स्मरिका असे या तरुणीचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील कुरुड ब्लॉकमधील चारमुडिया या गावात राहते. (Farmer Success Story)

Havaman Andaj । नागरिकांना सोसावा लागणार उन्हाचा चटका! मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु

स्मरिकाने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केले आहे. त्यानंतर तिने पुण्यातून एमबीएचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाली. परंतु अचानक तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने ती वडिलांच्या देखभालीसाठी परत आली. तिने 2020 मध्ये 23 एकर क्षेत्रावर भाजीपाल्याची शेती करायला सुरुवात केली.

Black pepper । करा ‘या’ गुणकारी काळ्या मिरीची शेती, एका झाडापासून मिळेल हजारोंचे उत्पन्न

कमाई

शेती सुरू करण्याअगोदर स्मरिकाने कृषी तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार, जमिनीच्या गुणवत्तेनुसार योग्य बियाणे निवडले. स्मरिका शेतीतून दररोज 12 टन टोमॅटो आणि 08 टन वांग्याचे उत्पादन घेत असून त्यांचा पुरवठा देशातील वेगवेगळ्या राज्यांत केला जात आहे. इतकेच नाही तर ती या भाज्यांची विक्री आणि पुरवठा करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर देखील घेते. ती वार्षिक एक कोटींपेक्षा जास्त उलाढाल करते. 150 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Success story । सरलाताईंच्या जिद्दीला सलाम! कर्ज काढून फुलविली ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती, मिळवले १५ लाखांचं उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *