Success story । मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला कोणीच यशस्वी होण्यापासुन अडवू शकत नाही. आजही अनेकजण पारंपरिक पद्धतीने पिके घेतात. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.
Agriculture news । सफरचंद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.त्यामुळे अनेकजण आता ड्रॅगन फ्रूटची लागवड (Dragon Fruit Cultivation) करत आहेत. त्यातून त्यांना लाखोंचा फायदा होत आहे. मेहनतीच्या जोरावर सरलाताई चव्हाण यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon Fruit Farming) करून १५ लाखांचं उत्पन्न मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या कामात त्यांना त्यांच्या पतीची आणि कुटुंबची मोलाची साथ मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी चार वर्षांपूर्वी दूरचित्रवाहिनीवर या शेतीविषयी माहिती ऐकली.
Government Schemes । सरकार देतंय वराहपालनासाठी अनुदान, आजच करा ‘या’ सोप्या पद्धतीने अर्ज
कमाई
त्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण म्हणजे चव्हाण कुटुंब मागील २५-३० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे, परंतु, प्रत्येक वर्षी या पिकाला निश्चित परतावा मिळाला नाही. त्यामुळे हे कुटुंब आर्थिक दृष्ट्या खचले होते. त्यामुळे त्यांनी माहिती घेत ड्रॅगन फ्रूटची शेती केली. आणि आज हे कुटुंब लाखात कमाई करत आहे.
Success story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! २५ टन पेरूतून घेतले तीस लाखांचे उत्पन्न
अशी केली सुरुवात
चव्हाण कुटुंबाकडे या फळाची शेती करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी दोन एकरांवर कर्ज काढून ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्यातून त्यांना फायदा झाल्याने आज त्यांनी चार एकरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. यंदा त्यांनी रोपवाटिका तयार केली असून ती रोपे इतर राज्यांच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिली जातात. यातून त्यांना लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे.
Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट