Success Story । सध्या अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र यामध्ये असे काही जण आहेत जे चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायाची निवड करतात आणि त्यामध्येच आपले उत्कृष्ट करिअर घडवतात. असे अनेक तरुण आपण पाहिले आहेत जे परदेशातील नोकरी सोडतात आणि गावाकडे येऊन शेती करतात. त्याचबरोबर सरकारी नोकरी सोडून देखील अनेकजण शेती करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. (Young Farmer Success Story)
Onion Rate । सध्या कांद्याला किती भाव मिळतोय? जाणून घ्या मार्केटमधील रेट
सध्याचे तरुण शेतकरी हे परंपरागत पद्धतीने शेती न करता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती आता मोठ्या प्रमाणात करत आहेत. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या तरुणाने चक्क पोलीस खात्यातील नोकरी सोडली आणि चंदन शेती करण्याचा निर्णय घेतला. (Cultivation of white sandalwood)
उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्ह्यातील पदरी बाजार या गावच्या रहिवासी असलेल्या अविनाशने पोलीसाची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. नोकरीमध्ये मन लागत नसल्यामुळे सात वर्षातच या तरुणाने नोकरी सोडली आणि पांढरी चंदन शेती करण्याचा निर्णय घेतला. 1998 मध्ये पोलीस सेवेत हा तरुण रुजू झाला असून 2005 मध्ये त्याने राजीनामा दिला आणि शेती करायला सुरुवात केली.
Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या
शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतीमध्ये काय करावे? असा मोठा प्रश्न पडला यानंतर त्या तरुणाने पांढऱ्या चंदनाची लागवड करायची ठरवले आणि अविनाश कुमार याने 2012 मध्ये पांढऱ्या चंदनाची लागवड करायची निश्चित केली व प्रयोग म्हणून शेतामध्ये फक्त पाच ते सात चंदनाची रोपे लावली. यानंतर रोपे चांगली आली आणि यामुळे यातून चांगला फायदा मिळेल असे या तरुणाला वाटले आणि त्याने कर्नाटक या राज्यातून 50 सफेद चंदन रोपांची चंदनाची रोपे आणली.
या शेतीच्या आवडीच्या माध्यमातून त्याने देशातील तब्बल 80 कृषी विज्ञान केंद्र आणि 25 कृषी विद्यापीठांना भेटी दिल्या व त्या भेटीदरम्यान अनेक वेगवेगळी माहिती घेतली आणि त्या सर्व माहितीचा वापर करून त्याने चंदनाची शेती केली. त्याच्या चंदनाच्या झाडांना अजून दहा वर्षाचा कालावधी जायचा असून दहा वर्षानंतर चंदनाची झाडे परिपक्व होतील आणि यामधून त्यांना कोट्यावधींचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा अविनाशने व्यक्त केली आहे.