Success Story । शेतकऱ्यांना दरवर्षी विविध संकटांचा सामना करत शेती करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. अशातच दरवर्षी शेतमालाला अपेक्षित असा हमीभाव मिळतोच असे नाही. त्यामुळे युवा शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीला (Modern agriculture) सुरुवात करत आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळवता येत आहे.
Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये
दुष्काळी परिस्थितीवर केली मात
हल्ली अनेक शेतकरी आधुनिक शेतीतून चांगली कमाई करत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने 2 एकरातून तब्बल 75 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. वाचून तुम्हालाही नवल वाटले असेलच. जालिंदर सोळसकर (Jalandar Solaskar) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील रहिवासी आहे. खरतरं हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
असे केले नियोजन
त्यांनी योग्य ते नियोजन करत दोन एकरात ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरचीची लागवड (Cultivation of capsicum) केली. पाण्यासाठी त्यांनी ड्रिप इरिगेशनचा वापर केला. (Capsicum Cultivation) मल्चिंग पेपर आणि मांडव पद्धतीचा उपयोग करून त्यांनी शिमला मिरची लावली. पिकासाठी त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली आहे. यामुळे पिकावर कोणताही रोग पडला नाही आणि पीक देखील चांगल्या पद्धतीने आले आहे.
Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..
आता शिमला मिरची लागवड करून पाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यांनी या कालावधीत मिरचीची एकूण 13 वेळा तोडणी केली आहे. मिरचीच्या पिकातून त्यांनी तब्बल 75 लाखांची कमाई केली आहे. यातून त्यांना जवळपास 150 टन माल मिळाला असून त्यांना जवळपास आठ महिन्यांपर्यंत यातून उत्पादन मिळेल.
दरम्यान, म्हणजे आणखी तीन महिने या पिकातून त्यांना उत्पादन मिळणार आहे. खर्चाचा विचार केला तर मिरचीच्या पिकासाठी त्यांना दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे. या पिकातून त्यांना 65 लाख रुपयांची निव्वळ कमाई झाली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करत जालिंदर यांनी योग्य ते नियोजन केल्याने त्यांची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.