Unseasonal Rain

Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये

बातम्या

Unseasonal Rain । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain in Maharashtra) फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांना अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे दरवर्षी अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. यंदा अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवर असणारी शेतीचे नुकसान केले आहे.

Farmers Producer Organization । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जैविक निविष्ठा केंद्र सुरु करून मिळवा 1 लाख रुपये

शेतकऱ्यांना लागवडीसाठी आलेला खर्च वसूल करता आला नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. याच शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाशिक विभागासाठी 144 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. लवकरच मंजूर झालेली मदत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Fund for farmers)

Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..

मंजूर झाले 2109 कोटी रुपये

इतकेच नाही तर आता राज्यातील इतरही नुकसानग्रस्त विभागातील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली आहे. पुणे नागपूर, अमरावती, कोकण, आणि छत्रपती संभाजीनगर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2109 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Document Registration । बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! आता अदृश्य होणार आधार, पॅन, बोटांचे ठसे

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुणे विभागाकडून 15903.33 लाख रुपये, नागपूर विभागाकडून 11887.63 लाख रुपये, कोकण विभागाकडून 485.09 लाख रुपये, अमरावती विभागाकडून 109589.07 लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागाकडून 70992.41 लाख रुपयाच्या निधीची मागणी केली होती.

Garlic Price । लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लसूण दरात झाली मोठी वाढ; पाहा किती मिळतोय दर?

3 हेक्टरपर्यंत मिळणार आर्थिक मदत

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मधील अवकाळी पाऊस तसेच गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने आता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *