Online Buffalo Fraud । गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाची जास्त किंमत (Buffalo milk price) असते. म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा (Buffalo milk) पौष्टिक असते, त्यामुळे डॉक्टरही म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला देतात. बाजारात अशा काही म्हशीच्या जाती आहेत ज्या जास्त उत्पादन मिळवून देतात. जर तुम्ही त्यांचे संगोपन करून पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.
अलीकडच्या काळात अनेकजण कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी (Online shopping) करण्यास पसंती देतात. पण जर तुम्ही ऑनलाइन वस्तू खरेदी करत असाल तर तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच एका व्यक्तीला ऑनलाइन म्हैस खरेदी करणे (Online buffalo shopping) महागात पडले आहे.
यूट्यूबवर पाहिली म्हशीची जाहिरात
हे प्रकरण हरचंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांडा गावातील रहिवासी सुनील कुमार हे त्यांच्या गावात दुधाचा व्यवसाय करतात. सुनील कुमार यांना म्हशींची संख्या वाढवायची होती. त्यावेळी त्यांनी एका युट्यूब चॅनलवर दुभत्या म्हशी पाहिल्या. यावेळी चॅनलवर या म्हशी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले होते.
Ravikant Tupkar । शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
दिला 10,000 रुपये ॲडव्हान्स
सुनील कुमार यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, स्वत:ला जयपूर येथील व्यापारी सांगणाऱ्या शुभम नावाच्या व्यक्तीने म्हशींची किंमत सांगितली. शुभमने सांगितले की, त्याच्याकडे एक चांगली जातीची म्हशी उपलब्ध असून जी दिवसाला १८ लीटर दूध देते. सायबर ठग शुभम याने म्हशीची किंमत ५५ हजार रुपये सांगितली. त्याने म्हशीचे छायाचित्रही व्हॉट्सॲपवर पाठवले.
Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र
सुनील कुमार यांनी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असता फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने दहा हजार रुपये ॲडव्हान्स मागितले. माझ्या खात्यावर दहा हजार रुपये पाठवा आणि उरलेली रक्कम म्हशीची डिलिव्हरी झाल्यावर द्या, असे सुनील कुमार यांनी सांगितले. यानंतर सुनील कुमार यांनी शुभमच्या खात्यात दहा हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.
Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा
पोलिसांकडून तपास सुरू
दुसऱ्या दिवशी म्हैस आली नसल्याने त्यांनी शुभमशी संपर्क साधला. पण शुभम म्हणाला अजून पंचवीस हजार पाठवा मग म्हैस देतो. यामुळे सुनील कुमार यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Milk Production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई