Milk production । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची निवड करावी लागेल. गायीच्या चांगल्या प्रगत जाती आहेत, ज्यांचे संगोपन तुम्ही करू शकता.
पशुपालकांना काहीसा दिलासा
पण सध्या गाईच्या दुधाचे दर (Cow milk rates) खूप कमी झाले आहेत, त्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही असे बोलले जात आहे. पण सरकारी अनुदानाचा तुम्हाला फायदा होईल. अशातच आता दूध संस्थांना धक्का देणारी बातमी आहे. कारण सरकारने फॅट (Milk fat) काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
MGNREGA Budget 2024 । अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होत राहणार
दरम्यान, दूध संस्थांच्या पातळीवर फॅट पाहण्यासाठी (Fat detection) १०० मिलीपर्यंत दूध घेण्यात येते. बहुतांशी संस्था अशा आहेत ज्या हे दूध उत्पादकांना परत देत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांकडून सकाळी आणि सायंकाळी असे दोनवेळचे एकूण २०० मिली दूध घेण्यात येते. पण असे केल्याने म्हैस दूध उत्पादकांना दिवसाला दहा रुपये आणि गाय दूध उत्पादकांना सात रुपयांचा आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!
केली जाणार दोषींवर तातडीने कारवाई
खरंतर राज्य सरकारच्या नियमानुसार फॅट सँपलसाठी केवळ २० मिली दूध घेण्याची मुभा आहे. पण काही दूध संस्था १०० मिलीपर्यंत दूध घेतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत आता जास्त दूध संस्थांवर कारवाईची मोहीम दुग्ध विभागाने हाती घेतली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून दोषींवर तातडीने कारवाई केली जात आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! अनेक राज्यांमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरूच राहणार
वास्तविक, दुग्ध विभागांतर्गत जिल्ह्यातील एकूण सहा हजार संस्थांचा कारभार चालवला जातो. दूध संस्थांमधील फॅट आणि वजन मापे हा मुद्दा अनेक दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. वजन मापांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार वैधमापन शास्त्र विभागाचे असून फॅटवर नियंत्रण कोणाचे हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे दूध संस्थांची मनमानी वाढत चालली आहे.
Animal Husbandry । जनावरांच्या शरीराला पाण्याची किती गरज असते? वाचा महत्वाची माहिती