Animal Husbandry

Animal Husbandry । जनावरांच्या शरीराला पाण्याची किती गरज असते? वाचा महत्वाची माहिती

पशुसंवर्धन

Animal Husbandry । दूध उत्पादकांमध्ये जनावरांच्या पाण्याच्या गरजेबद्दलची माहिती अपूरी दिसून येते. तसेच या बाबींकडे लक्ष दिले जात नाही. यासाठी खालील काही ठोकताळे नमूद करीत आहोत. ज्याच्या मदतीने पशुपालकांना मोठा फायदा होईल.

१. एक ली. दूध निर्माण करण्यासाठी ४ ते ५ ली. पाणी पिणे आवश्यक आहे.

२. एक किलो शुष्क (पाणीविरहित) खाद्य पचविण्यासाठी ४ ते ५ ली. पाणी पिणे आवश्यक आहे.

३. अगदी माणसाप्रमाणेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांमध्ये फरक होतो, जसे- जर का वातावरणातील तापमान जास्त असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, तसेच थंडीच्या दिवसात ते कमी होते.

  • दिवसभराच्या खाद्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असेल, तर पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.
  • आपण साधारणपणे आधी खातो व मग पाणी पितो, तशीच गरज जनावरांची सुद्धा असते. परंतू उत्पादक आपल्या सोयीने जनावरांना पाणी दाखवित असतात.
  • ऋतुमानाप्रमाणे पाण्याच्या थंड किंवा कोमटपणावर पाणी पिण्याचे
  • प्रमाण कमी जास्त होवू शकते. उन्हाळयात गार पाणी उपलब्ध असल्यास पुरेसे पाणी प्यायले जाते. तसेच क्षारयुक्त पाणी असल्यास जनावरे पाणी कमी पितात.
  • आपण तहान लागल्यावर पाणी पितो, पण जनावरांना मात्र आपल्या सोयीनुसार २ किंवा ३ वेळेस पाणी दाखवितो. तसेच त्यांचे मोजमाप ठेवले जात नाही.
  • सर्वसाधारणपणे वजनानुसार जनावरांस दिवसभरामध्ये ८० ते १२०ली. पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कायमस्वरुपी उपलब्धतता असणे उत्तम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *