Farmer News । सध्या नाशिकच्या एका शेतकऱ्याची सगळीकडे जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं चर्चा होण्याचं कारण असं की, या शेतकऱ्याने एका कारच्या किमतीमध्ये बैल जोडी खरेदी केली आहे. शेतकऱ्यांने चक्क साडेपाच लाख रुपयांना खिलार जातीची बैल जोड खरेदी केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी
यावर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही मात्र ही बातमी खरी असून शेतकऱ्याने तब्बल साडेपाच लाख रुपयांना खिलार जातीची बैल जोड खरेदी केली आहे . नाशिकच्या नामपुर बाजारात बाजारातून त्याने ही बैलजोड खरेदी केली आहे. राजूबाबा सूर्यवंशी असं या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी नाशिकच्या सणाटा तालुक्यातील मुंजवाड या ठिकाणचा रहिवासी आहे. यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या शेतकऱ्याने बैलजोडीची गावातून बँडच्या सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
Buffalo Milk । करा ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन! दिवसाला मिळेल ‘इतके’ लिटर दूध, होईल हजारोंची कमाई
याबाबत बोलताना राजूबाबा सूर्यवंशी यांनी सांगितले की, पायी दिंडीतील रथासाठी त्यांनी बैलांची जोडी खरेदी केली आहे. त्यामुळे या बैलांची किंमत करायची नाही सांगेल त्या किमतीला बैलांची खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतल. त्यांनी बैलजोडी नामपुर बाजारामधून खरेदी केली असून ही जोडी अहमदनगर जिल्ह्यातून नाशिक मध्ये विक्रीसाठी आली होती. आम्हाला ही बैलांची जोडी खूप आवडली त्यामुळे आम्ही त्यांची खरेदी केली असल्याची माहिती राजूबाबा सूर्यवंशी यांनी दिली आहे.
Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर
बैलजोडी खरेदी केल्यानंतर त्यांची मिरवणूक देखील काढली. बैलजोडीची गावातून बँड लावून मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर अनेक फेटा बांधलेले ग्रामस्थ देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी होते झाले होते. घरोघरी या बैलजोडीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. दरम्यान दरवर्षी एकादशीला काढण्यात येणाऱ्या मुंजवाड ते बेच पायी दिंडीतील रथासाठी ही बैलजोडी खरेदी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
Havaman Andaj । पुणेकरांना पावसाने झोडपले; जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अंदाज