Sugarcane Cultivation | महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन है एक प्रमुख कारण आहे. राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. म्हणून ऊस पिकाचे सासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसा प्रमाणेच खोडव्याचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे.
Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर
खोडवा पिकापासून होणारे फायदे
१. लागण ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्व मशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो…
त्यामुळे साधारणपणे हेक्टरी खर्चाची बचत होते.
२. पूर्वमशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रमांची बचत होते.
३. खोडवा घेतल्यामुळे ऊस लागवडीसाठी लागणारे येणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इ. बाबतीत खर्चाची बचत होते.
साधारणपणे प्रति हेक्टरी रु. ४०००० ते ४२००० एवढया पर्यंतच्या खर्चाची बचत होते.
४. लागणीचा ऊस तुटल्यानंतर खोडल्यास त्वरीत पाणी दिल्यास, पहिल्या पिकाच्या बुडख्याचे कांडीवरील डोळे लवकर
फुटतात, त्याची वाढ लगेचच सुरु होते व खोडवा पीक लागण पिकापेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होते. थोडया व्यवस्थापनात लागणी एवढे किंवा लागणीपेक्षा जास्त उत्पादन मिळते. खोडवा पिकास फुट होण्यासाठी जमिनीतील बुडख्यांवर भरपूर डोळे असतात. त्यामुळे ऊसाची संख्या लागणीच्या
५. ऊसापेक्षा जास्त आढळते.
६. खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते, ओलीचे संरक्षण, तणांचे नियंत्रणमुळे उत्पादनात तफावत पडत
नाही.
७. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते.
खोडवा पीक घेतांना विचारात घ्यावयाच्या बाबी
१. सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोड किडीचा
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
२. ज्या ऊस लागवडीच्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. अशा ऊसाचाच खोडवा ठेवावा.
३. ऊस पीक विरळ झाल्यास ४५ सेमी. पेक्षा जास्त अंतरावरील नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या ट्रे मध्ये तयार किंवा फुले ऊस रोपवाटिकेतील रोपे दुसऱ्या पाण्याच्या वेळी लावावीत.
४. खोडवा ठेवावयाची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी..
५. खोडवा पीक १२ ते १४ महिने क्याचे असतांना ऊसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा.
६. शिफारशीत केलेल्या ऊस जातीचाच खोडवा ठेवावा.
Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी
खोडवा राखण्याची योग्य वेळ
ऊसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल/मे पर्यंत केली जाते. या ऊसाचा खोडवा ठेवला जातो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते. म्हणून १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवू नये. पाडेगांव येथे झालेल्या संशोधनानुसार सप्टेंस ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच आडसाली, पूर्वहंगामी व सुरु या हंगामातील तुटलेल्या ऊसाच्या खोडवा ठेवल्यास पूर्वहंगामी ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते.
Buffalo Milk । करा ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन! दिवसाला मिळेल ‘इतके’ लिटर दूध, होईल हजारोंची कमाई
खोडवा ठेवताना या गोष्टी करू नयेत
१. पाचट जाळणे
२. पाचट शेताबाहेर काढणे
३. एका आड एक सरीत ठेवणे
४. बुडख्यांवर पाचट ठेवणे
५. रासायनिक खतांचा फोकुन वापर करणे
६. आंतरमशागत व मोठी बांधणी करणे
७. बगला फोडणे, जारवा तोडणे
८. पाण्याचा अतिवापर करणे
ऊस खोडवा व्यवस्थापन कार्यपध्दती
१. ऊस तोडणीनंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे व ऊसाचे बुडखे मोकळे करावेत जेणे करून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. खोडवा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी, बुडखे छाटणी, बगला फोडणे, खते देणे इ. कामे सोपी झाली आहेत.
२. ऊसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत त्यामुळे जमिनी खालील कॉब फुटण्यास बाब मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्याची छाटणी न केल्यास जमिनीच्यावरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे ऊसात रूपांतर होते.
३. शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया व १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर ११० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. पाचट कुजण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते.
४. खोडवा ऊसाला पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो. तरी सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीने लक्ष द्यावे. पाचट जास्त असल्यास जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा जनावरांच्या पायाने दावून घ्यावे पाचटाचा मातीशी संबंध येवून हळूहळू कुजण्याची क्रिया सुरु होते.
५. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३-४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. खते देण्यासाठी पाडेगांव येथे विकसीत केलेल्या नवीन पध्दतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या औजाराच्या सहाय्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यांत द्यावी, पहिली खतमात्रा १५ दिवसांचे आतच पूर्ण करावी. यासाठी पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ से.मी. अंतरावर संख्याच्या बगलेत १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेवून त्यामध्ये ३० से.मी. आंतर ठेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दुसरी खतमात्रा विरुध्द बाजूस त्याच पध्दतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि खते दिल्यानंतर नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
खोडव्यामध्ये पाचटाचा आच्छादन म्हणून प्रभावीरीत्या वापर करण्यासाठीची पूर्वतयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी ऊसाच्या दोन सत्यांमधील अंतर कमीत कमी १.२० मीटर (४ फुट) असावे किंवा जमिनीच्या मगदुरानुसार रुंद समी अथवा जोडओळ पध्दतीने ऊसाची लागण करावी म्हणजे, पट्ट्यात पाचट चांगले बसते व फुट चांगली होते
आंतरमशागत
संवर्धीत खोडवा व्यवस्थापन पध्दतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. म्हणजेच जारवा तोडण्याची किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे आणि खते पहारीच्या सहाय्याने टाकल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. तो उगवल्यास ती उपटून शेतातच पाचटावर टाकावीत. ऊस उगवल्यानंतर लव्हाळा किंवा हरळीसारख्या तणांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास या तणांच्या नियंत्रणासाठी ५० मिली ग्लायफोसेट १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तणनाशक ऊसावर पडू देवू नये यासाठी प्लास्टोक हुडचा वापर करून जमिनीलगत तणावर फवारणी करावी.
पाणी नियोजन खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पध्दतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळ्या लागतात. परंतु नवीन तंत्रामध्ये फक्त १२ ते १४ पाण्याच्या पाळया असल्या तरी खोडवा ऊसाचे चांगले उत्पादन मिळते. खोडवा ऊसासाठी दोन पाण्याच्या पाळ्यांतील अंतर नेहमीच्या पध्दतीपेक्षा दिडपटीने वाढवावे. पाचटाचा अच्छादनासाठी वापर केल्यामुळे ४० ते ४५ दिवस पाणी नसले तरी ऊसाचे पीक चांगले तग धरु शकते. त्यामुळे ही पध्दत, ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे, त्या भागांसाठी वरदानच ठरेल.
ऊस खोडवा व्यवस्थापन पध्दतीमुळे होणारे फायदे
१) पाचट आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि त्यामुळे शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते…
२) आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. त्यामुळे तणावाटे होणारा अन्नद्रव्यांचा न्हास कमी होतो व तण नियंत्रणासाठी लागणाऱ्या खर्चातही बरीचशी बचत होते.
३) सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारणशक्ती वाढते, तसेच जमिनीचे इतर भौतिक गुणधर्म सुधारतात आणि उपयुक्त जीवाणूंची संख्याही वाढते.
४ ) शेतात गांडूळांची नैसर्गिकरीत्या मोठया प्रमाणात वाढ होते. त्यांच्याकडून जमीन भुसभुशीत केली जाते, खते पहारीच्या औजाराच्या सहाय्याने दिली जात असल्याने गांडूळांवर त्याचा विपरीत परीणाम होत नाही.
५) सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत असताना त्वामध्ये असणारी अन्नद्रव्ये ऊसाला उपलब्ध होत असतात.
६) पाचट कुजल्यामुळे त्यापासून कार्बलीक तसेच इतर आम्ले तयार होतात, त्यांचा जमिनीतील अन्नघटकावर परीणाम होवून, ती पीकांना उपलब्ध होतात आणि त्यांचा पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग होतो..
७) पाचटाने जमिनीचे तापमान थंड राखले जाते, त्यामुळे मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि उन्हाळयातही पिकाला उन्हाचा त्रास होत नाही.
८) पाचट कुजण्याच्या प्रक्रियेमुळे सुक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने ऊसाची चांगली वाढ होते.
९) खते पहारीच्या सहाय्याने दिल्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जात नाहीत आणि हासही होत नाही. तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी
हातो.
१०) सेंद्रिय पदार्थ कुजत असताना त्यातून कार्बन डाय ऑक्साईड (CO) वायू बाहेर पडत असतो. वनस्पतीला कर्बग्रहणाच्या (Photosynthesis) क्रियेसाठी हा कार्बनडाय ऑक्साईड वायू लागतो. हवेमध्ये या वायूचे प्रमाण ३०० पीपीएम एवढे असते. परंतू पाचट ठेवलेल्या क्षेत्रात हे प्रमाण पाचट कुजणेच्या प्रक्रियमुळे हळूहळू वाढत जाते आणि त्यावेळेस कर्यग्रहणाचा वेगही वाढतो. ऊसाची जोमदार वाढ होते आणि परीणामी अधिक उत्पादन घेणे शक्य होते. अशाप्रकारे वा नवीन तंत्राचा वापर करून कमी खर्चात खोडक्याच्या जास्त उत्पादनाबरोबरच जमिनीची सुपीकताही टिकवली जाते. म्हणून खोडव्यात पाचट ठेवण्याच्या तंत्राचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
ऊसाचा खोडवा काढून टाकावयाचा असल्यास पाचट व्यवस्थापन असे करा
- खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास शेतातील पाचट पेटवू नये अगर शेताबाहेर काढू नये. • खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते, • पाचट कुट्टी मशीनच्या साहयाने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
- पाचट कुजविणेसाठी पाचटावर एकरी एक पोते युरिया व एक पोते सिंगल सुपर फॉस्फेट व त्यानंतर एकरी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू टाकावे. ऊसाच्या बुडख्यांचे व मुळयांचे लहान तुकडे करण्यासाठी व काढणेसाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.. साखर कारखान्यातील प्रक्रिया केलेली प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजणेस मदत होते.
- पलटीच्या साहायाने पाचट जमिनीत गाडावे (मातीआड करावे) व आवश्यकता असल्यास शेतास पाणी द्यावे. अशा प्रकारे पाचट दोन ते तीन महिन्यात चांगल्या प्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते.