Sugarcane Crop । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते, राज्यात ऊस हे प्रमुख पीक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जर तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पादन देणाऱ्या उसाच्या जातीची (Varieties of sugarcane) लागवड करावी लागते. उसाच्या अनेक जाती आहेत. त्यातील जातीमुळे उसाचे भरघोस उत्पादन (Sugarcane Crop Management) मिळते.
जर तुम्ही उसाचे उत्पादन घेत असाल तर तुम्ही योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. काही शेतकऱ्यांना योग्य नियोजनामुळे एकरी 100 टनाचे उत्पादन मिळते. नाहीतर नियोजनाशिवाय उसाचे एका एकरमधून जास्तीत जास्त 25 ते 30 टन उत्पादन मिळते. जास्त उत्पादन मिळावे म्हणून काही शेतकरी विविध प्रयोग करत असतात. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो.
Onion Export Ban । शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका! सरकारनं घातली कांद्याच्या निर्यातीवर बंदी
याचाच प्रत्यय सांगली जिल्ह्यात आला आहे. कृषी भूषण संजय माने (Sanjay Mane) यांनी उसाचे एकरी 100 टन यशस्वी उत्पादन घेतले आहे. ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ऊस संजीवनी पॅटर्ननुसार (Sugarcane Sanjeevani Pattern) उसाचे पूर्ण वर्षभर नियोजन केले आहे. कसे केले नियोजन जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
आडसाली ऊस संजीवनी पॅटर्ननुसार लागवडी पूर्वी करा ही कामे
- अगोदर जमिनीमध्ये उसाची पाचटीची कुट्टी करून गाडून घ्यावी लागते.
- रोटर मारून नांगरट करून शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करा.
- शेतात सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करा. यात 20 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत 15 टन वापरा. तसेच त्यात हिरवळीचे खत,गांडूळ खत वापरा.
- ढेकळे असल्यास ते फोडून बारीक करून घेऊन सरी काढा.
- सरी काढून सरीमध्ये थोडेसे सेंद्रिय खत पसरून घ्या. शक्य असल्यास तर कारखान्याची काळी राख 800 ते 900 किलो पसरून घ्या.
- सरीत सेंद्रिय खत टाकून त्यावर रासायनिक खते बेसल डोस टाकून हलक्याशा अवजाराने सरींच्या मातीमध्ये चांगली मिसळून घ्या. लागवडीवेळी करा हे काम
- बियाण्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची प्रक्रिया करून लागवड कराव. एक ग्रॅम बुरशीनाशक, कीटकनाशक एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून घेऊन बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवा.
- उसाची लागवड करण्यापूर्वी सरीत पाणी सोडून जमीन ओलवून घ्या. कोरड्यात लागण केल्यास लगेच पाणी द्या किंवा पाण्यात लागवड करा.
- लागवड केल्यानंतर सहा ते सात दिवसात हलकेसे पाणी द्या.
Success Story । नोकरी नाही तर फुलशेती करून उच्च शिक्षित तरुणाने कमावलं लाखो रुपये, असं केलं नियोजन
अशा प्रकारे करा आळवणी
उसाला आळवणी केल्यास पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होते. उसाची वाढ वेगाने होते. फुटवे एकसारखे येऊन जोमदार आणि योग्य प्रमाणात आपल्याला मिळतात. आळवणी करत असताना रोपांची लावणी केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी किंवा कांडी लावणी केल्यास सहा ते आठ दिवसांनी जमिनीत ओल असेल त्यावेळी 12:61:00- एक किलो, ब्लॅक बॉक्स एक, बुरशीनाशक 400 ग्राम, किडनाशक 400 मिली ( 200 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करा.)
Banana Farming । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! आता केळीपासून बनणार बिस्किटे, कसं ते जाणून घ्या
पॅटर्ननुसार बेण्यातील अंतर
मध्यम आणि हलकी जमीन असल्यास जमिनीत एक डोळा दीड फुटावर आणि मध्यम खोल काळ्या जमिनीमध्ये एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावा.
Farm Pond Subsidy । सावधान! तुमचेही बॅंक खाते आधार संलग्न नसेल तर मिळणार नाही शेततळ्यांचे अनुदान
तणनाशकाचा वापर
लागवड केल्यास तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी जमिन ओली असेल त्यावेळी मेट्रीब्युझिनची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम दीडशे लिटर पाण्यातून समान पद्धतीने फवारणी करा.
MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?
बेसल डोस
बेसल डोस देण्यासाठी डीएपी 100 किलो, पोटॅश 75 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य 15 किलो, गंधक 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, कीटकनाशक दहा किलो(फरटेरा)
Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा
उस संजीवनी फवारणी क्रमांक 1( लागवडीपासून 45 व्या दिवशी)
पहिली फवारणीत संजीवनी आणि पोषणद्रव्ये सोबत बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा समावेश करावा. या कालावधीत खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि बुरशी त्रास देत असल्याने हे फवारणी योग्य ठरते. ( यासाठी 60 लिटर पाणी पुरेसे ठरते.)
Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक तीन( लागवडीनंतर 85 व्या दिवशी)
तिसऱ्या फवारणीसाठी 135 लिटर पाणी पुरेसे आहे.
जिवाणू खते( भरणी केल्यापासून दहाव्या दिवशी)
नत्र स्थिर करणारे जिवाणू एक लिटर, स्फुरद विरघळणारे एक लिटर आणि ट्रायको एक लिटर
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक चार( लागवडीपासून 105 व्या दिवशी)
चौथी फवारणीसाठी 150 लिटर पाणी पुरेसे असून चौथी फवारणी ऊस पिकासाठी खूप फायदेशीर असते. यानंतर ऊस उंच वाढतो आणि त्यामुळे फवारणी करणे शक्य होत नाही.
Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का
रासायनिक खतांचा डोस क्रमांक सहा( भरणी केल्यापासून 30 दिवसांनी)
अमोनियम सल्फेट 45 किलो,24:24:00 100 किलो, पोटॅश 25 किलो आणि लिंबोळी पेंड दहा किलो मिसळून सरित टाकावे.
ऊस संजीवनी फवारणी क्रमांक पाच( लागवडीनंतर 125 दिवसांनी)
शक्य झाल्यास पाचवी फवारणी करून यासाठी 180 लिटर पाणी पुरते.
रासायनिक खतांचा डोस क्रमांक सात( भरणी केल्यापासून 60 दिवसांनी)
अमोनियम सल्फेट 50 किलो व पोटॅश 25 किलो