Farm Pond Subsidy । शेतकऱ्यांना हजारो समस्या येत असतात. तरीही न डगमगता त्यावर मात करत शेतकरी शेती करतात. शेतकऱ्यांवर संकट आल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी काहीवेळा हतबल होतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांना (Government Schemes) सुरुवात केली आहे. ज्याचा लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. जर तुम्ही मागेल त्याला शेततळे (Farm Pond) या योजनेचा लाभ घेत असाल तर जरा इकडं लक्ष द्या.
MNREGA Job Card । बिग ब्रेकिंग! १० लाखांपेक्षा जास्त मनरेगा जॉब कार्ड रद्द, नेमकं कारण काय?
मिळणार नाही शेततळ्यांचे अनुदान
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन (Chief Minister Sustainable Agriculture Irrigation) या योजनेतून नवीन शेततळ्यांची खोदाई केलेल्या अंदाजे पाच हजार शेततळ्यांना ३३ कोटी रुपयांहुन अधिक अनुदान (Farm Pond Scheme) आतापर्यंत दिले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी बॅंक खाते (Bank account) आधार (Aadhar Card) संलग्न केले नाही त्यांना शेततळ्यांचे अनुदान दिले नाही. सरकारने या शेतकऱ्यांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Ravikant Tupkar । रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच रविकांत तुपकर आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा
कृषी विभागाने यापूर्वी शेततळ्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी ऑफलाइन अर्ज पद्धत बंद केली आहे. ऑनलाइन अर्ज मागवून सोडत काढणे आणि केवळ सोडतीत पात्र ठरलेले अर्ज विचारात घेण्याचे पूर्वीचे धोरण रद्द केले आहे. महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज करताच क्षणी अनुदानाचा लाभ, या नवीन धोरणानुसार ऑनलाइन अर्ज मागवून तातडीने मंजुरी देण्यात येत आहे.
Dense Fog । सावधान! देशातील अनेक राज्यांमध्ये आज धुके पडणार, या ठिकाणी पाऊसही पडण्याचा अंदाज
१७२१९ शेततळे खोदाईसाठी पूर्वसंमती
राज्यभरातील शेततळे अनुदान योजनेच्या प्रक्रियेत ७६७१९ शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेतले जात आहेत. अनुदानासाठी निवड केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २८१४१ शेतकऱ्यांनी सरकारच्या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड केली आहेत. त्यातील १७२१९ शेततळे खोदाईसाठी पूर्वसंमती दिली असून कृषी विभागाला तळे खोदाई पूर्ण झाल्यामुळे अनुदान मिळावे यासाठी राज्यभरातून ५२८५ गावांमधून अनुदान मागणी प्रस्ताव दिले आहेत.
जागेवर तळ्याची तपासणी केल्याअनुदान देण्याची भूमिका कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे. ‘अनुदान मागणी करणाऱ्या प्रस्तावांपैकी ५२८५ प्रस्तावांना अनुदान देण्याबाबत कृषी विभागाची सकारात्मक भूमिका आहे. त्यासाठी तळ्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येते. तपासणीअंती ४९७० तळ्यांना अनुदान दिले असून आधार संलग्न नसणाऱ्या ७० प्रकरणांना तूर्त अनुदान दिले जाणार नाही, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का