Kisan credit card

Kisan credit card । सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात लाखो रुपयांचं कर्ज, जाणून घ्या योजना

शासकीय योजना

Kisan credit card । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना (Govt schemes) सुरु करत असते. ज्याचा आज देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. परंतु, असेही काही शेतकरी आहेत ज्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती नसते.

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

किसान क्रेडिट कार्ड

यापैकीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC) आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज देण्यात येते. स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येतो. (Agri loan)

Land Law । कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असते? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

योजनेअंतर्गत तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड कर्ज (Kisan Credit Card Loan) सर्वात कमी व्याजदराने कर्ज मिळते. समजा एखाद्या शेतकऱ्याने वेळेपूर्वी व्याज भरले तर त्याला सरकार स्वतंत्रपणे सबसिडी देण्यात येते. म्हणजे तुम्हाला फक्त 4 टक्के एकूण व्याज द्यावे लागणार आहे.

Weather Update । शेतकऱ्यांनो पिकाची काळजी घ्या, पुढील पाच दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा हवामान खात्याचा इशारा

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅनकार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शपथपत्र, ज्यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसल्याची माहिती असते.
  • पत्त्याचा पुरावा

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

असा करा अर्ज

  • तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागणार आहे. आता किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करावा लागेल.
  • फॉर्म भरून या फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करावी लागतील. आता बँकेकडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात येते. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेतूनही फॉर्म मिळवू शकता.

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *