Agricultural Exhibition

Agricultural Exhibition । ऐकावे ते नवलच! तंत्रज्ञानाचा डबल फायदा, टोमॅटोच्या झाडाला बटाटे

बातम्या

Agricultural Exhibition । हल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठे बदल होत आहेत. सध्या बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन (Agricultural Exhibition in Baramati) सुरु आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग पाहता येत आहेत. अनेक कृषी तज्ज्ञ या प्रदर्शनामध्ये आले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आले आहेत. (Baramati Agricultural Exhibition)

Land Law । कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असते? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

दरम्यान, बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाने टोमॅटोचे पीक (Tomato crop) विकसित केले आहे. यामुळे एकाच वेळी एका झाडावर बटाटे आणि टोमॅटोचे पीक घेता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही संकल्पना राबवून देशात प्रथमच नवीन संकल्पना राबवली आहे. पोमॅटो (Pomato) ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेतले आहे.

Weather Update । शेतकऱ्यांनो पिकाची काळजी घ्या, पुढील पाच दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा हवामान खात्याचा इशारा

काय आहे पोमॅटो?

पोमॅटो म्हणजे टोमॅटोच्या झाडाला वर टोमॅटो आणि खाली बटाटे, असा प्रयोग आहे. यामुळे एकाच ठिकाणी दोन पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना घेणे शक्य झाले आहे. या भन्नाट प्रयोगामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. हा प्रयोग पाहण्यासाठी या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना एकच गर्दी केली होती.

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

दरम्यान, टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेतले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल, हे नक्कीच. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. विविध राज्यामधून शेतकरी या प्रदर्शनाला भेटी देत आहेत.

Gairan Lands । गायरान जमीन नावावर करता येते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *