Asafoetida History | सर्वच स्वयंपाकघरात हिंग वापरतात. त्याची काहीशी उग्र चव असते. हिंगामुळे जेवणाला चांगली चव येते. त्यामुळे गृहिणी हमखास हिंगाचा वापर करतात. आयुर्वेदानुसार हिंगाचे खूप फायदे आहेत. फराळी चिवड्यांमध्ये, लोणचे यांसारख्या पदार्थांमध्ये त्याचा वापर करतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? हिंग (Asafoetida) भारतीय पीक नाही. भारतात हिंग खूप उशिरा आला. (History of Asafoetida)
Milk Rate । दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आंदोलन करणार, तारीखही झाली निश्चित
हिंग भारतीय नाही, तर मग तो कोठून आणि कसा आला? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान, हिंग इराण ओलांडून भूमध्यसागरी प्रदेशांत परिचित होते. अलेक्झांडर द ग्रेटच्या मोहिमांनंतर ते युरोपात आले आहे, असे बोलले जात आहे. इशान्य प्राचिन पर्शियाच्या सहलीवरून परतल्यानंतर त्यांना असे समजले की उत्तर आफ्रीकेत एक चवदार वनस्पती सापडली (Asafoetida Cultivation) असून त्याची चव खूप विलक्षण आहे.
Tur Market Today । शेतकऱ्यांची पुन्हा निराशा! कमी झाले तुरीचे दर, प्रति क्विंटल दोन हजारांचा फटका
समजा एखाद्याने हिंगाचा स्वाद घेतला तर त्याच्या काहीश्या वासाने अंगावर शहारे आले . त्यानंतर हळूहळू युरोपात हिंग वापरात आला. परंतु त्याची चव इतकी आगळी वेगळी होती की चव लोकांना आवडत नव्हती. जरी भारतातील आयुर्वेदात हिंगाचे उल्लेख असला तरी हिंगाचे पीक अरबांची देण आहे, असे सांगितले जात आहे. हिंगाची चव ही प्राचीन काळापासून आहे.
असे तयार केले जाते हिंग
हिंगाची जाड दुधामध्ये मैदा आणि डिंक मिसळून खाण्यायोग्य बनवतात. यानंतर पेस्ट 30 दिवस उन्हामध्ये वळवण्यात येते. ते मिश्रण कोरडे व्हावे यासाठी ड्रायरचा वापर करता येत नाही. असे केल्याने त्याचा सुवास नष्ट होतो. त्यानंतर त्याची पावडर तयार करतात.
PM Kisan Yojana । निवडणुकांपूर्वी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात येणार ‘इतके’ पैसे
कुठे येते हिंगाचे झाड?
अफगाणिस्तानच्या उच्च प्रदेशातील हिंदुकुश टेकड्यांमध्ये कच्च्या हिंगाचे घनरूप दूध गोळा करण्यात येते. इराण आणि उझबेकिस्तानच्या थंड भागात आढळते. पूर्वी बकऱ्याच्या चामडीत बंद करुन ट्रान्सपोर्ट (Asafoetida Information) केले जायचे. आता ते भारतात दुधाची पिशवी किंवा जाड प्लास्टिकमध्ये गुंडाळून आणतात.
परदेशातून आयात
हिंग परदेशातून आयात करण्यात येते. अफगाणीस्तान इराण आणि काही प्रमाणात हिंग उझबेकीस्तानमधून आयात करतात. पठाणी, अफगाणी हिंगाला अधिक जास्त असते. दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात हिंग लागवडीला सुरुवात झाल आहे. उत्तर प्रदेशातील’हाथरस’ जिल्हा हिंग उत्पादनात अग्रेसर आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या हिंगाची भारतभर विक्री होते. सौदी अरेबिया कुवेत, बहारीन या देशांना निर्यात करतात.
Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये