PM Kisan Yojana । देशात लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. राज्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर कोणत्या पक्षाला जनता निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच निवडणुकांपूर्वी (Loksabha Election) भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना (PM Kisan) सुरु केली आहे. नुकताच या योजनेचा 15 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. झारखंडमधील जाहीर कार्यक्रमात हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. शेतकरी आता पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.
एकाच वेळी मिळणार 16 वा आणि 17 वा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा आणि 17 वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. इतकेच नाही तर या हप्त्याच्या रकमेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जर हप्त्याच्या रकमेत वाढ झाली तर शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट पैसे येऊ शकतात. शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा हप्ता मिळू शकतो.
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळी या योजनेंतर्गत तीन हप्त्यांमध्ये वार्षिक दिले जाणारे 6000 रुपये 8,000 ते 9,000 रुपये केले जातील.
18,000 कोटी ट्रान्सफर
दरम्यान, या योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्यादरम्यान 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल 18,000 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2.80 लाख कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये