Government Schemes

Government Schemes । काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना? कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या

शासकीय योजना

Government Schemes । देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. परंतु शेती करताना अनेक समस्या येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेती करत असताना शेतकऱ्यांचे अपघात देखील होत असतात. वीज पडणे, पूर, सर्पदंश यांसारख्या अपघातांमुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. यामुळे शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त होतात. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता सरकारने एक योजना राबवली आहे.

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे देशातील हवामान बदलणार, या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाची माहिती

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Farmers Accident Safety Relief Subsidy Scheme) असे तिचे नाव आहे. सुरुवातीला या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या समस्या समोर आल्या होत्या. परंतु, सरकारने त्यावर उपाय शोधून काढला. अनेकजण या योजनेचा (Gopinath Munde Farmers Subsidy) लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनेचा फायदा होत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

जाणून घेऊयात पात्रता

 • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
 • ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नाही परंतु ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर त्या कुटुंबातील कोणत्याही 1 सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्ष असावे.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

या ठिकाणी करा अर्ज

शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या १ महिन्याच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावा लागेल. एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून देखील अर्ज करू शकता.

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

आवश्यक कागदपत्रे

 • मृत्यूचा दाखला
 • शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद
 • सातबारा उतारा
 • आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
 • वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक
 • मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटलाचा अहवाल

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

हे अपघात अपात्र

 • नैसर्गिक मृत्यू
 • आत्महत्येचे प्रयत्न
 • योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व
 • गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करताना झालेला अपघात
 • सैन्यातील नोकरी
 • शरीरांतर्गत रक्तस्राव
 • मोटार शर्यतीतील अपघात
 • युद्ध
 • अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

हे अपघात पात्र

 • पाण्यात बुडून मृत्यू
 • जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
 • विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
 • रस्ता किंवा रेल्वे अपघात
 • वीज पडून मृत्यू
 • खून
 • उंचावरून पडून झालेला अपघात
 • बाळंतपणातील मृत्यू
 • दंगल
 • सर्पदंश आणि विंचूदंश
 • जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *