Combine Harvester । कृषी क्षेत्रात आता खूप प्रगती झाली आहे. मजुरांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. यंत्रांच्या मदतीने शेतीची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होत आहेत. गरज आणि मागणी लक्षात घेता आता बाजारात देखील वेगवेगळी शेतीसाठी गरजेची असणारी यंत्रे (Crop Harvesting) येऊ लागली आहेत. या यंत्रांना अनेक शेतकरी खरेदी करत आहेत. असेच एक यंत्र बाजारात उपलब्ध आहे.
ज्याच्या मदतीने तुम्हाला कापणी आणि मळणी करता येईल. सध्या खरीप हंगामातील काढणी सुरु आहे. परंतु काढणी आणि मळणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. तुम्ही कम्बाइन हार्वेस्टरच्या (Farm Mechanization) मदतीने या समस्यांवर मात मिळवू शकता. कापणी आणि मळणीसाठी हे यंत्र खूप फायदेशीर आहे. या यंत्राच्या मदतीने तुमची आर्थिक बचत होईल. शिवाय कमी वेळेत जलद गतीने काम पूर्ण होईल.
यासाठी आहे फायदेशीर
या यंत्राचा वापर गहू, हरभरा, भात, सोयाबीन, सूर्यफूल आणि मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व मळणीसाठी केला जात आहे. कापणीच्या सोबत मशीन दाणे वेगळे करून ते गोळा करते. महत्त्वाचे म्हणजे हे शेतात आडवे आणि तिरपे पडलेले पीक काढते. एका तासात 4 ते 5 एकर पीक कापून स्वच्छ धान्य शेतकऱ्यांना मिळते.
Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल
जाणून घ्या प्रकार
- ट्रॅक्टरचलित कम्बाइन हार्वेस्टर – या कम्बाइन हार्वेस्टर मशिनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवण्यात येते. या हार्वेस्टरला ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे ऊर्जा देण्यात येते.
- स्वयंचलित कम्बाइन हार्वेस्टर – या प्रकारच्या हार्वेस्टरमध्ये स्वतःचे एक इंजिन बसवले जाते. त्याद्वारे हार्वेस्टरमधील सर्व यंत्रणांना ऊर्जा देण्यात येते.
- ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर्स – या कम्बाइन हार्वेस्टर मशिनला चाकांऐवजी ट्रॅक बसवले असतात. ही टिकाऊ ड्रायव्हर्स, उच्च ग्राउंड क्लीअरन्स, हेवी-ड्यूटी चॅसिस आणि पंप असणारी एक टिकाऊ रचना आहे.
खासियत
- हे एक स्वयंचलित मशीन असून ते ड्रायव्हरच्या मदतीने चालते.
- गरजेनुसार सर्व उपकरणे जोडली आहेत.
- या यंत्राच्या मदतीने पिकांची काढणी व मळणी एकाच वेळी करता येते. किंमत
- कंबाईन हार्वेस्टरची किंमत कंपनी आणि बाजारातील हार्वेस्टरचा आकारावर असते.
- भारतीय बाजारात मशीनची किंमत 10 ते 50 लाखांपर्यंत आहे. तुम्ही अनुदानावर खरेदी करू शकता.
किंमत
- कंबाईन हार्वेस्टरची किंमत (Combine Harvester Price) कंपनी आणि बाजारातील हार्वेस्टरचा आकारावर असते.
- भारतीय बाजारात मशीनची किंमत 10 ते 50 लाखांपर्यंत आहे. तुम्ही अनुदानावर खरेदी करू शकता.
Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक