PMFME Scheme । केंद्र आणि राज्य सरकार फक्त सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी नाही तर उद्योगांसाठी देखील अनुदान देत आहे. ज्याचा लाभ घेऊन अनेकांना फायदा होत आहे. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत (PM Mudra Scheme) १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. सध्या सरकार ३ कोटींपर्यंतचे अनुदान देत आहे.
हे अनुदान अन्न प्रक्रिया उद्योगासाठी (Food processing industries) मिळेल. खरंतर अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Food Processing Industry Subsidy) राबवण्यात येत आहे. बेरोजगार तरुण आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमालावर प्रयोग करायचा आहे अशांना या योजनेचा लाभ होईल. काय आहे योजना? कसा घेता येईल लाभ? आणि किती मिळेल अनुदान? जाणून घेऊयात.
Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक
कोणाला मिळेल लाभ?
प्रगतशील शेतकरी, वैयक्तिक लाभार्थी, नवउद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/भागिदारी, शेतकरी उत्पादक कंपनी, गैर सरकारी संस्था, स्वयंसहायता गट, सहकारी संस्था आणि त्यांचे फेडरेशन, खासगी कंपन्यांना लाभ मिळेल.
कशासाठी मिळेल लाभ?
कोरडवाहू पिके, नाशवंत फळपिके, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, मसाला पिके, गूळ आधारित उत्पादने, दुग्ध व पशू उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादनांसाठी लाभ मिळेल.
Land Measurement । जमीन मोजणीसाठी किती खर्च येतो? अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
किती मिळेल अनुदान?
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला निगडित प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख तर गट लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के किंवा ३ कोटी रूपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. यात राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सामावेश आहे. सर्व उद्योजकांना योजनेसाठी अर्ज करता येईल.
Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला
वैयक्तिक लाभार्थ्यासाठी अर्जाची प्रक्रिया
- www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी आणि अर्ज करता येईल.
- जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत कार्यवाही
- बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया
- बँकेद्वारे कर्ज वितरण
- पात्र प्रकल्पांना अनुदान वाटप
- जिल्हास्तरीय समितीची कार्यवाही
Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार
गट लाभार्थ्यासाठी अर्जाची प्रक्रिया
- www.pmfme.mofpi.gov.in MIS Portal वर नोंदणी आणि अर्ज करता येईल.
- जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत कार्यवाही
- जिल्हास्तरीय समितीमार्फत पात्र प्रकल्पाची शिफारस
- बँकेद्वारे कर्ज वितरण
- राज्य नोडल एजन्सीमार्फत बँकेकडे सादर
- पात्र प्रकल्पांना अनुदान वाटप
- बँक कर्ज मंजुरी प्रक्रिया
Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड