Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

हवामान

Havaman Andaj । निम्मा नोव्हेंबर महिना संपत आला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले (Heavy Rain Update) आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Rain Update) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट झाली आहे.

Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच अरबी समुद्राच्या वायव्य आणि पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. समुद्राचं बाष्प थेट महाराष्ट्र राज्यावर येत आहे. खास करून दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूला त्याचा प्रभाव जास्त (Maharashtra Weather) असल्याचे पाहायला मिळत आहे. भूगर्भातील पाण्याचं आणि समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. ऋतूंच्या सीमारेषा नाहीशा होत चालल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना बसत आहे.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

थंडीचा वाढणार कडाका

शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता राज्यातील ढगाळ वातावरण निवळत चाललं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पावसाने माघार घेतली होती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. परंतु पुन्हा नोव्हेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सध्या जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. याचाच परिणाम राज्यातील ढगाळ वातावरणावर झाला आहे. त्यामुळे राज्यात लवकरच थंडी पडेल, असा अंदाज केला जात आहे. या हंगामात गहू आणि हरभरा ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.

Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट

वाढती थंडी या दोन पिकांसाठी फायदेशीर ठरेल. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्याचे पुढील काही दिवस वातावरण थंड राहू शकते. पुढील काही दिवसांत राजधानी दिल्लीत धुके पडतील तर काही ठिकाणी धुके तर दिवसा आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उत्तर प्रदेशातही पावसानंतर वातावरण आल्हाददायक असल्याचे जाणवत आहे.

MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *