MS Dhoni । क्रिकेट विश्वातलं लोकप्रिय नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीने अनेक दिग्ग्ज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढलं आहे. एमएस धोनीचं बाईकप्रेम जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. परंतु तुम्हाला धोनी चालवतो त्या ट्रॅक्टरची किंमत किती आहे ते माहिती आहे का? या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांची अनेक कामे सोयीस्कर होतात.
धोनी स्वराजचा Swaraj 855 FE ट्रॅक्टर चालवताना दिसला होता. नवीन आणि भन्नाट फिचर्ससह येणारा हा ट्रॅक्टर (Swaraj) शेतकऱ्यांच काम खूप सोपं करतो. भारतीय बाजारपेठेत या कंपनीचे ट्रॅक्टर्सचे 30 पेक्षा जास्त मॉडल्स उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसापूर्वी महिंद्रा ग्रुपने आपल्या यूट्यूब चॅनलवर या ट्रॅक्टरचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान
Swaraj 855 FE या ट्रॅक्टरची खासियत म्हणजे त्याला 6 वर्षांचा वॉरंटी पिरीयड असून तो कंटेम्परेरी स्टाइल आणि एडवान्स फिचर्सचा कॉम्बो आहे. हा ट्रॅक्टर पावर आणि परफॉर्मन्समध्ये देखील उत्तम आहे. तो शेतीशी निगडित कितीही कठोर कामे सहज पूर्ण करतो. ट्रॅक्टर 29.82-37.28 kW वर 41-50 HP पॉवर तयार करण्यास सक्षम आहे.
Government Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसाही मिळणार वीज
किती आहे किंमत?
कंपनीकडून यात 3 सिलेंडर देण्यात आले आहेत. कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनीची निवड केली आहे. किमतीचा विचार केला तर या ट्रॅक्टरची किंमत (Swaraj 855 FE Price) 6.9 लाख (एक्स-शोरूम) ते 9.95 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.
Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण