Agriculture Exhibition । राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शासकीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ज्याचा फायदा असंख्य शेतकरी घेत असतात. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) माहिती मिळते. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याची माहिती कृषिभूषण महेश बेदरे यांनी दिली आहे.
Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान
या महोत्सवात शेतकऱ्यांचे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे स्वप्न पूर्ण होईल. कारण यंदा खास शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी दरात हेलिकॉप्टर राईडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पैशात हेलिकॉप्टरमध्ये बसता येईल. पहिल्यादांच हे कृषी महोत्सव हटके होणार यात काहीच शंका नाही. गेवराईतील दसरा मैदानावर २० ते २४ डिसेंबरदरम्यान ८ एकरात ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरेल.
Government Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसाही मिळणार वीज
दरम्यान, या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, आत्माचे प्रकल्प संचालक आणि महाएपीएसी फेडरेशन यांचा सहभाग असेल. २०० कृषी उत्पादनांचे स्टॉल भरणार असून एक दिवसीय पशुप्रदर्शन तज्ज्ञांची चर्चासत्रे देखील या महोत्सवात होणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.
Milk Rate । सणासुदीच्या काळात पशुपालकांना मोठा धक्का, गाईच्या दूध दरात मोठी घसरण