Eknath Shinde

Eknath Shinde । कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

बातम्या

Eknath Shinde । अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा करत आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही समोर आले आहे. सध्या हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरु आहे. या अधिवेशनात कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

सरकारी योजनांमार्फत सरकारने शेतकऱ्यांना मागील दीड वर्षात 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde In Assembly Winter Session) यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. परंतु तांत्रिक अडचणीमुळे 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना (Farmers Deprived Of Loan Waiver) त्याचा लाभ मिळाला नाही.

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

त्यामुळे आता या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा (Loan Waiver) लाभ दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार 190 कोटी रुपये जमा केले आहेत. धानासाठी 2022-23 मध्ये हेक्टरी 15 हजार रुपये बोनस दिला होता. यावर्षी बोनस वाढवून हेक्टरी 20 हजार रुपये केल्याचीही घोषणा शिंदे यांनी केली आहे.

Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती

नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने 9 लाख 75 हजार हेक्टरवर असणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आंदोलन करत होते. सरकार मोठे पॅकेज जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात 1 हजार 851 कोटी रुपये वितरित करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या तुलनेत आपल्या सरकारने कशी चांगली कामगिरी केली हे सांगत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. त्यावर उत्तर देत शिंदे म्हणाले की, आम्ही कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली आहे, असा प्रश्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण कराव, असेही शिंदे म्हणाले आहेत.

Milk Subsidy । लिटरमागे दुधाला ५ रुपये अनुदान द्या, दूध उत्पादकांची सरकारकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *