Milk Subsidy

Milk Subsidy । दूध दराबाबत राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

बातम्या

Milk Subsidy । शेतकऱ्यांवर यंदा मोठे संकट आले आहे. पाऊस नसल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. त्यामुळे चारा खूप महाग झाला आहे. शिवाय दुधाचे दर (Milk Rate) खूप कमी झाले आहेत. पशुपालकांना (Cattle breeders) याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. दर कमी (Milk Rate Falls Down) झाल्याने पशुपालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांना घेरले.

Eknath Shinde । कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

विखे-पाटलांनी केली मोठी घोषणा

राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत असताना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी लवकरात लवकर दुधाला अनुदान देऊ अशी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सरकारची भुमिका असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. परंतु हे सांगताना यात कोणतीही संधी नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाले दुधाचे दर

बोलताना विखे पाटील म्हणाले की, “१.५ कोटी लिटर पैकी १ कोटी लिटर दुध हे पाऊच पॅकिंग करण्यात येते. तर उर्वरित दुधाची भुकटी आणि बटर केले जाते. परंतु, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाचे कमी झालेले दर (Milk prices in the international market) यामुळे दुधाची भुकटी आणि बटर हे निर्यात केली जाऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारचा (Central Govt) हा प्रश्न आहे.

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

मात्र यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हस्तक्षेप करतील. राज्यात कर्नाटकच्या धर्तीवर कसे अनुदान देता येईल, यावर शिफारशी करण्यासाठी त्रिसद्यसीय समिती तयार केली आहे. जी येत्या दोन दिवसात शिफारसी सादर करतील. त्यानंतर अधिवेशन संपण्यापूर्वी अंतिम निर्णय घेतला जाईल असे म्हटलं आहे.” अशी विखे पाटील यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती

हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) म्हणाले, “राज्य सरकार दुधाला १० रू अनुदान देणार का? दुधाची पावडर आणि बटर हे निर्यात केले जाणार का?” त्याशिवाय जयंत पाटील यांनी दूध दरासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. यावर विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, आता दूध दरावरून तोडगा कधी निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *