Rabi Sowing

Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले

बातम्या

Rabi Sowing । सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी (Jowar) हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन (Jowar cultivation) घेतले जाते. यंदा ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात (Crop price) झाली आहे.

Government Schemes । पशुपालकांसाठी शेवटची संधी! 75 टक्के अनुदानावर घेता येणार विविध योजनांचा लाभ

किती झाल्या पेरण्या?

यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने पेरण्या कमी झाल्या आहेत. याच कारणामुळे धान्यांचे दर वाढत आहेत. १२ डिसेंबरपर्यंत बोलायचे झाले तर यंदा सरासरीच्या ६९ टक्केच पेरणी झाली असून ज्वारीची गतवर्षीपेक्षा फक्त ३७ हजार हेक्टर जास्त पेरणी झाली आहे. तसेच मका, गहू, हरभरा आणि तेलबियांसह इतर पिकांच्या पेरण्या कमी झाल्या आहे. राज्यात आतापर्यंत ३७ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहे. (Crop Sowing)

Havaman Andaj । मोठी बातमी! या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला मोठा अंदाज

पाण्याची टंचाई

सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे रब्बीचे क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत ६९ टक्के म्हणजे ३७ लाख १९ हजार ५३७ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढू शकते. अनेक शेतकरी गहू, कांदा, हरभरा या पिकांकडे वळले आहे.

Milk Subsidy । लिटरमागे दुधाला ५ रुपये अनुदान द्या, दूध उत्पादकांची सरकारकडे मागणी

यावर्षी ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) हिंगोली, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त झाली असली तरी तेथे सरासरी क्षेत्र खूप कमी आहे. सोलापूर जिल्ह्यापाठोपाठ बीड, नगर, धाराशिव जिल्ह्यांत ज्वारीचे सर्वात जास्त पेरणी क्षेत्र आहे. त्याशिवाय सांगली, जालना, परभणी, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत ज्वारीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, चंद्रपूर, कोल्हापूर, नंदुरबार, जालना, बुलडाणा आणि नांदेडसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ज्वारीचे पेरणीक्षेत्र तुलनेनं खूपच कमी आहे.

Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

तसेच मागील वर्षीपेक्षा यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्र सव्वापाच लाख हेक्टर, मक्याचे ६५ हजार, तर गव्हाचे दोन लाख हेक्टर क्षेत्र कमी आहे. यामध्ये गव्हाची चार लाख ७० हजार ५४९ हेक्टरवर आणि हरभऱ्याची १७ लाख ५३ हजार ११२ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरण्या कमी प्रमाणात झाल्याने यंदा धान्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *