Electric Bull

Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

तंत्रज्ञान

Electric Bull । अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. जशी पद्धत बदलली आहे त्याचप्रमाणे पिके घेण्याची देखील पद्धत बदलली आहे. आधुनिक पिकांमुळे (Modern crops) शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. त्याशिवाय शेतीसाठी आवश्यक असणारे अनेक अवजारे (Agricultural machines) बाजारात दाखल होऊ लागली आहेत. या अवजारांच्या मदतीने शेतकऱ्यांची कामे सोयीस्कर आणि जलद गतीने होऊ लागली आहेत.

Nursery Subsidy । शेतकऱ्यांनो, सोडू नका अशी संधी! ‘या’ सोप्या पद्धतीने आजच मिळवा नर्सरी अनुदान, जाणून घ्या अर्जपद्धती

इलेक्ट्रिक बैल

नुकतेच शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील मोशी येथे सर्वात मोठे कृषि प्रदर्शन (Pune Kisan Exibition) भरले होते. या प्रदर्शनात विविध प्रयोग पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना या किसान प्रदर्शनात (Kisan Exibition) विविध उपकरणे खरेदी देखील करता येत होती. परंतु, संपूर्ण प्रदर्शनात इलेक्ट्रिक बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बैलाच्या मदतीने मातीची भरणी, बियाणे पेरणे, खुरपणी, आंतरमशागत, किटकनाशकांची फवारणी यांसारखी कामे करता येतात.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

कमी खर्चात जास्त फायदा

यंत्र चार्जिंगच्या मदतीने चालते. त्यामुळे शेतकऱ्यांना देखभाल खर्च अल्प प्रमाणात आणि एकाच यंत्रामध्ये विविध कामे होतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. यंत्रासाठी इंधनाची गरज भासत नाही. इंधन लागत नसल्याने त्याचा खर्च वाचतो. शिवाय मजुरांचा देखील खर्च वाचतो. अशाप्रकारे शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त फायदा होतो.

Success Story । पोलिसाचा नादच खुळा! नोकरीला लाथ मारली अन् चक्क सुरू केली पांढऱ्या चंदनाची शेती

दरम्यान, या प्रदर्शनाला राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. यात त्यांना विविध प्रयोगांची माहिती घेता आली, शिवाय अनेक उपकरणे शेतकऱ्यांनी केली. जर तुम्ही अजूनही प्रदर्शन पाहिले नसेल तर तुमच्याकडे शेवटची संधी आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही आज मोशी येथे जाऊन किसान प्रदर्शन पाहू शकता.

Onion Rate । सध्या कांद्याला किती भाव मिळतोय? जाणून घ्या मार्केटमधील रेट

शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात झालेले बदल समजत नाही, यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मागील अनेक वर्षांपासून ‘किसान’कडून प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना जगातील नवनवीन आणि वेगवेगळे तंत्रज्ञान, निर्यात व्यवस्था, मानवरहित शेती तंत्रज्ञान, शेती क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग, नवे यंत्र, शेतीपूरक व्यवसाय, विपणन व्यवस्था, शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग पाहण्याची आणि खते, बियाणे, किटकनाशके, शेती निविष्ठा कंपनीच्या थेट महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलता येत आहे.

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले मात्र नेपाळमध्ये 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर पोहचला कांदा

पहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *