Electric Motor

Electric Motor । मोटार का जळते? बिघाड टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या गोष्टी कधीच जळणार नाही मोटार; जाणून घ्या

तंत्रज्ञान

Electric Mootor । विजेवर चालणाऱ्या मोटारी दोन प्रकारच्या असतात, ए.सी. व डी.सी. महाराष्ट्रात खेडेगावात व शेतातून ए. सौ. पद्धतीचा वीज पुरवठा असल्यामुळे ए.सी. मोटारीच वापरल्या जातात. एका यंत्राला ज्यावेळी एका तारेतून वीज पुरवठा केला जातो तेव्हा त्याला सिंगल फेज व तीन तारातून केला जातो तेव्हा त्याला थ्रिफेज म्हणतात. लहान लहान कामासाठी एक अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) किंवा त्यापेक्षा कमी शक्तीच्या मोटारींना एका फेजमधून पुरवठा करतात. परंतु जास्त शक्तीच्या यंत्रांना तीन तारातून बीज पुरवठा करतात. ए. सी. मोटारी सुरु होतात तेव्हा सुमारे ३ ते ५ पट विद्युतप्रवाह घेण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्यासाठी
स्टार्टर वापरतात.

Shednet house planting । शेडनेटगृह लागवडीचे फायदे काय? यामध्ये कोणती पिके घेता येतात? वाचा डिटेल माहिती

मोटारीची निवड करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

१) मोटार व स्टार्टर स्टुण्डर्ड कंपनीची (आय.एस.आय. चिन्हयुक्त) असावी.

२) मोटारीची किंमत बाजवी असावी.

३) करावयाच्या कामाचे स्वरुपानुसार योग्य अश्वशक्तीची मोटार घ्यावी.

४) दर मिनीटास किती फेऱ्या आवश्यक आहेत (पंपाचे, गिरणीचे, चरकाचे फेर लक्षात घेऊन) हे माहित असावे.

५) मोटार बसवावयाची जागा ही पाणी, धुळ अथवा कचऱ्यापासून सुरक्षित असावी.

Agriculture News । शेतकऱ्यांनो, तुम्ही एकाच रोपातून वांगी, टोमॅटो आणि मिरची काढू शकता, ICAR ने तयार केली एक अप्रतिम वनस्पती

मोटार जळणे

मोटार तापून तिच्या वेटोळ्यातील तारेवरचा पापुद्रा जळून वेटोळे काळे पडले, की मोटार जळाली असे म्हणतात. मोटार खालील कारणामुळे जळण्याचा संभव असतो.

१) कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर त्यापेक्षा जास्त काम करून घेण्याचा (ओव्हर लोड) प्रयत्न असल्यास तारेचे वेटोळे

विद्युतप्रवाह घेण्याचा प्रयत्न करते आणि मोटार जळते.

२) मोटारीवरील तारेचे वेटोळे पाण्यात बुडणे किंवा ओले होणे..

३) उंदीर, पाली, झुरळे, लहान बेडुक मोटारीत शिरल्यास आणि विद्युतप्रवाह अनियमित होवून मोटार जळते.

४) मोटारीमध्ये धूळ, कचरा जमा झाल्यास ती तापते.

५) मोटारीतील रोटर व स्टेटर एकमेकांवर घासले गेल्यास

Sugarcane Cultivation | खोडवा ऊस राखण्याची योग्य वेळ कोणती? आंतरमशागत, पाणीव्यवस्थापन कसे करावे? वाचा महत्वाची माहिती

बिघाड टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी

१) मोटारीवर पाणी उडू देऊ नये. सुरु करण्यापूर्वी मोटारीत पाणी शिरलेले नाही याची खात्री करून घ्यावी.

२) कचरा, धुळ, कीटक, पाली, उंदीर वगैरेपासून मोटार सुरक्षित ठेवावी. ३) मोटारीचे फौंडेशन समपातळीत करावे. बेअरिंगला वेळच्या वेळी ग्रीस व तेल द्यावे..

४) कमी शक्तीच्या मोटारीकडून जास्त शक्तीचे काम करून घेऊ नये.

५) फाट्याच्या काडीच्या किंवा इतर वस्तूचा टेकू लावून मोटार चालवू नये. ६) मोटार सतत चालवू नये, तिला अधुनमधून विश्रांती द्यावी.

(७) मोटार जळाल्यास खात्रीच्या ठिकाणाहून रिवाईडींग करून घ्यावी.

८) मोटारीचा पंखा काढून टाकू नये,

९) फ्यूज वायर योग्य त्या रेटींगचीच निवडावी म्हणजे कोणत्याही कारणाने बिघाड झाला तर फ्युज बायर तुटून मोटारीला संरक्षण मिळेल व ती जळणार नाही.

१०) मोटारीच्या संरक्षणासाठी स्टार्टर योग्यपणे वापरावा. विजेपासून अपाय होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

१) अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर नावाचे स्विच वापरावे. तसेच मोटारीसाठी अर्थिंग करून घ्यावे. २) कोरड्या लाकडी फळीवर उभे राहून बोर्डाचे काम करावे. तसेच रबरी बूट किंवा चप्पल चापरावे, मात्र ते ओले असू नयेत.

Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *