Spraying machine । अलीकडच्या काळात शेतीत खूप बदल झाले आहेत. या बदलांमुळे शेती करणे फार सोपे झाले आहे. पूर्वी मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत अशी सगळी कामे मजुरांच्या साहाय्याने केली जायची. पण आता मजुरांची जागा यंत्रांनी (Agricultural machinery) घेतली आहे. असे जरी असले तरी या यंत्रांची किंमत (Agricultural machinery price) जास्त आहे.
शेतकरी पुत्राने तयार केले फवारणी यंत्र
अजूनही पिकांवर औषधांची फवारणी करायची असेल तर जास्त कष्ट करावे लागतात. अशातच घातक औषधांचा संपर्क आल्याने काहीजण दगावल्याचेही आपण पाहतो. अशातच आता प्रेरणादायी बातमी समोर येत आहे. शेतकरी बापाचं कष्ट पाहून नववीत शिकणाऱ्या एका मुलाला मायेचा पाझर फुटला आहे. त्याने अनोखे फवारणी यंत्र (Agricultural sprayer) तयार केले आहे.
प्रथमेश वाळके (Prathamesh Walke) असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. तो अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयात शिकतो. त्याचे वडील पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. पण एका अपघातादरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि कोवळ्या वयातच पितृछत्र हरपले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. शिक्षण घेताना त्याने शेती करण्याचे ठरवले.
यंत्रांच्या मदतीने तयार होतात विविध कामे
त्यासाठी त्याने एका कागदावर आराखडा तयार केला. त्याने आपल्या वडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर पाहिले. त्यामुळे त्याने एक अद्भुत शेती यंत्र तयार केले असून हे शेती यंत्र अवघ्या एका तासात चार एकर जमिनीवर फवारणी करते. इतकेच नाही तर या यंत्राच्या माध्यमातून कोळपणी, दूध काढणे, खत भरणे यांसारखी अनेक कामे केली जातात.
Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक
अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी या यंत्राचे सादरीकरण करण्यात आले. प्रथमेश याने तयार केलेल्या या शेती यंत्राची अनेकांनी दखल घेतली असून या संशोधनासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. लहान वयातच घराची जबाबदारी सांभाळून अनोखे यंत्र तयार केल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.