Amol Kolhe

Amol Kolhe । सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून अमोल कोल्हे संतप्त, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर केले गंभीर आरोप

बातम्या

Amol Kolhe । येत्या तीन महिन्यांत देशभरात सार्वत्रिक निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. हा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प होता. सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्पातील तरतुदीवरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Animal Husbandry Business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय

सरकारनं केले शेतकऱ्यांचं वाटोळं

“कांदा निर्यातबंदी (Onion export ban) करून सरकारनं भारतीय शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. पण पाकिस्तान शेतकऱ्यांचं मात्र भलं केलं. सरकारच्या निर्णयामुळे युरोप आणि अन्य देशांची कांदा बाजारपेठ पाकिस्तानकडे गेली आहे. मी असं ऐकलं होत की, केंद्र सरकार पाकिस्तानची कंबरडं मोडणार होतं. पण त्यांनी कंबरडं मोडलं ते शेतकऱ्यांचं,” असा गंभीर आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. (Budget session)

Government Schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना

शेतकऱ्यांचं भाजप सरकारच्या काळात उत्पन्न दुपट्टीनं कमी झालं आहे. मागील ६ महिन्यापासून केळी पीक मिळावा यासाठी जळगावमधील शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावावी अशी मागणी शेतकरी करत होते. पण शेतकऱ्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळं शुक्रवारी सकाळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पण शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायलाही वेळ नसल्याचं शेतकरी सांगत होते.

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

परभणी जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारा चारा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश काढला आहे. येणाऱ्या काळात चारा टंचाई निर्माण होईल. कारण सध्या एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. या जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि एकूण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

सरकारला आली उशिरा जाग

“जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देऊ नये, असे आदेश गावडे यांनी दिले आहेत. मराठवाड्यामध्ये यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे या भागात चारा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. चारा टंचाईचं समस्या निर्माण होऊ शकते, याबद्दल विविध अहवालातून माहिती देण्यात आली होती. खरीप आढवा बैठकीतही यावर चर्चा झाली होती. पण उपाययोजना राबवल्या नाहीत. आता मात्र ऐनवेळीला प्रशासनाला खडबडून जाग आलीय,” असेही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *