Melon Cultivation

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

कृषी सल्ला

Melon Cultivation । युवा शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीला (Modern agriculture) सुरुवात करत आहेत. यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळवता येत आहे. जर तुम्हाला शेतीतून जास्त कमाई करायची असेल तर तुमची कष्ट करण्याची तयारी असावी लागते. शिवाय तुम्हाला योग्य ते नियोजन देखील करावे लागते. तरच तुम्हाला कमी वेळेत भरघोस कमाई करता येईल.

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

करा खरबूज लागवड

जर तुम्हाला शेतीतून जास्त कमाई करायची असेल तर तुम्ही खरबूज लागवड (Cultivation of melons) करू शकता. कारण खरबूज हे असे पीक आहे जे कमी वेळेत जास्त उत्पादन मिळवून देते. शिवाय या पिकाला चांगली मागणी असते. या पिकाची लागवड उष्ण आणि कोरड्या भागात करण्यात येते. जर तुम्हाला कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही या पिकाची लागवड (Melon Cultivation Information) करू शकता.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

उन्हाळ्यात या पिकाला चांगली मागणी असते. तुम्ही ‘कजरी’ जातीच्या खरबूजाची (Melon) लागवड केली तर याचा तुम्हाला फायदा होईल. अनेकजण खरबुजाची बागेत लागवड करतात. या जातीचा खरबूज गडद हिरव्या ते हलका तपकिरी रंगाचा असून त्यावर काळे आणि पांढरे पट्टे असतात. एका फळाचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत असते. कमी वजन आणि लहान आकारामुळे फळे जास्त वेळ ताजी राहतात.

Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये

पेटा लागवड तंत्र

तुम्ही पेटा लागवड तंत्राचा वापर करून खरबूजाची लागवड करू शकता. पेटा काष्टामध्ये संरक्षित पाण्याची मर्यादित उपलब्धता तसेच जमिनीची उच्च सुपीकतेमुळे खरबूज पिकामध्ये कोणत्याही खताचा वापर केला जात नाही. यामुळे खरबुजाचा नैसर्गिक सुगंध आणि चव कायम राहते. अनेकजण सामान्य खरबुजापेक्षा पेटा काष्टा खरबुजाला जास्त महत्त्व देतात.

Farmers Producer Organization । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जैविक निविष्ठा केंद्र सुरु करून मिळवा 1 लाख रुपये

या खरबुजाच्या गुणवत्तेमुळं पेटा काष्ठचे खरबूज बाजारात चांगल्या किमतीने विकले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि साखर मुबलक प्रमाणात आढळते. पेटा काष्टामध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला रेषा काढल्या कडून एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर हे 1 ते 1.25 फूट ठेवतात. तुम्ही एक एकर लागवडीतून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवू शकता.

Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *