Agriculture News । शेतकऱ्यांना नेहमीच शेती करताना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर कधी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. दरम्यान, शेतकऱ्यांची हीच धडपड लक्षात घेऊन यावर जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने एक संशोधन केले आहे. पाण्याशिवाय दोन महिने पीक तग धरू शकतील अशी एक विशिष्ट जैविक पावडर या तरुणाने बनवली आहे. (Jalgaon News)
प्रकाश पवार (Prakash Pawar) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन तयार केले आहे. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा होताना दिसत आहे. या तरुणाने एक जैविक पावडर तयार केली असून पेरणी करण्याच्या वेळी बियाणांसोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही. असा दावा या तरुणाने केला आहे. या पावडरचे पेटंट देखील प्रकाश पवार याने नोंद केले आहेत.
Havaman Andaj । सावधान! येत्या 24 तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर…
या तरुणाच्या संशोधनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दखल घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकाश पवार याच्याशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील तज्ञांची टीम देखील प्रकाश पवार याने संशोधन केलेल्या पावडरचा व त्याने वापर केलेला शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव या ठिकाणी जाणार आहे. या टीमने या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
Soybean Rate । आज सोयाबीनला किती दर मिळाला? जाणून एका क्लिकवर
गेल्या काही वर्षांची पावसाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्याकडे वळतो. त्यामुळे या तरुणाने शेतकऱ्यांसाठी हा भन्नाट शोध लावला आहे. आता पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरू शकणार असल्याने जळगाव जिल्ह्याबरोबरच मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी प्रकाश पवार यांच्या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.
Onion Rate । सोलापूर बाजारसमितीत कांद्याला मिळाला आज ‘इतका’ दर; वाचा एका क्लिकवर