Cardamom Cultivation । भारतात अनेक प्रकारच्या मसाल्यांची लागवड केली जाते, वेलची ही त्यापैकी एक आहे, ज्याची मागणी देश-विदेशातून वाढत आहे. भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये याची लागवड सहज करता येते. पण प्रामुख्याने वेलचीची लागवड महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथील शेतकरी करतात. चला तर मग जाणून घेऊया वेलची लागवड करण्याच्या सेंद्रिय पद्धतीबद्दल माहिती. (Cardamom Cultivation )
वेलची लागवड
वेलचीची लागवड प्रामुख्याने नारळ आणि सुपारी बागांमध्ये केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे वेलची पिकावर सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो, त्यामुळे शेतीमध्ये ओलावा आणि आर्द्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याची लागवड ही नारळ आणि सुपारी बागांमध्ये केली जाते. जर याचे योग्य व्यवस्थापन केले तर त्यामधून तुम्ही लाखो ते करोडो रुपये कमावू शकता.
सेंद्रिय पद्धतीने करा वेलची लागवड
शेतकऱ्यांनी शेतात सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केल्याने उत्पादनात जास्त नफा मिळतो. त्यामुळे आता शेतकरी प्रत्येक पिकात सेंद्रिय शेतीचा अवलंब करत आहेत. वेलची लागवडीतही शेतकरी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत आहेत. या शेतीसाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. वेलची लागवडीसाठी किमान तापमान 10 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस असावे. याशिवाय शेतात सुपारी व नारळाची झाडे सुमारे ३x३ मीटर अंतराने लावावीत. याशिवाय प्रत्येक दोन झाडांमध्ये एक वेलची रोपे असावे.
Havaman Andaj । सावधान! येत्या 24 तासात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर…
पाणीव्यवस्थापन कसे करावे?
कोणत्याही पिकाचे लागवड करायची झाली तर त्यामध्ये पाणीव्यवस्थापन हे खूप महत्वाचे असते तुम्ही जर पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर तुम्हाला तुमच्या पिकांमधुन चांगले उत्पादन निघते. त्यामुळे वेलची लागवडीसाठी पाण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण त्याच्या लागवडीला जास्त पाणी लागते. परंतु पाण्याचे प्रमाण केवळ जमिनीतील ओलाव्यापुरते मर्यादित असावे. आणि दर चार दिवसांनी पाणी द्यावे.
Soybean Rate । आज सोयाबीनला किती दर मिळाला? जाणून एका क्लिकवर
कापणीची वेळ
वेलचीचे पीक पूर्ण पक्व झाल्यावर म्हणजेच पिकाचा रंग हिरवा आणि पिवळा झाला की, वेलची त्याच्या देठासह कापणी करावी लागते. वेलचीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे तुम्ही याची शेती करून चांगला नफा कमावू शकता.
Onion Rate । सोलापूर बाजारसमितीत कांद्याला मिळाला आज ‘इतका’ दर; वाचा एका क्लिकवर